Adipurush Manoj Muntashir Apology News: आदिपुरुष सिनेमा वादग्रस्त ठरला. सिनेमाचे VFX, डायलॉग, पवित्र रामायणाचं केलेलं विडंबन अशा अनेक गोष्टींमुळे आदिपुरुष विरोधात चहुबाजूंनी नाराजीचे सूर उमटले.
सिनेमात बजरंगबलीच्या मुखी टपोरी संवाद असल्याने भारतभर सिनेमाला विरोध झाला. आदिपुरुष सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी सुरुवातीला हनुमानाच्या तोंडी टपोरी संवाद असल्याचं समर्थन केलं. आता मात्र लेखक मनोज मुंतशीर यांना चुकीची जाणीव झाली असुन त्यांनी माफी मागीतलीय.
(Adipurush writer Manoj Muntashir finally apologises 'with folded hands' for 'hurting people's emotions')
मनोज मुंतशीर यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आदिपुरुष' चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो.
माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.
आपल्या सर्वांना एक आणि अतूट राहण्याची आणि आपल्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!' अशी पोस्ट मनोज मुंतशीर यांनी केलीय.
मनोज मुंतशीर यांनी माफी मागितताच हे ट्विट व्हायरल झाले. त्यांच्या या ट्विटवर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, 'संवाद लिहिण्यापूर्वी विचार करायला हवा होता.'
दुसऱ्याने लिहिले, 'तुम्ही संधीसाधू आहात.' तर काहींनी 'तुम्ही आमच्या माफीला पात्र नाही' असे लिहून प्रतिक्रिया दिली.
आदिपुरुष सिनेमाचा वाद थेट कोर्टात गेला. अलाहाबादमधील लखनऊ बेंचनं तीन दिवस आदिपुरुष खटल्यावर सुनावणी केली आहे.
पहिल्या दिवसापासून कोर्टानं वेगवेगळ्या गोष्टींवरुन आदिपुरुषच्या टीमला धारेवर धरले आहे.
चित्रपटामध्ये भगवान राम, हनुमान आणि सीता यांना ज्याप्रकारे दाखवण्यात आले आहे त्यावरुन मेकर्सला समाजात काय मेसेज द्यायचा आहे. हे त्यांनी सांगावे.
हे सगळं करुनही मेकर्स म्हणतात की हे रामायण नाही...ते प्रेक्षकांना वेड्यात तर काढत नाही ना असा प्रश्नही कोर्टानं केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.