Manoj Muntashir: गाण्याची चोरी ते Adipurush चे डायलॉग! याआधीही वादात अडकलाय मनोज मुंतशीर, जाणून घ्या इतिहास

पौराणिक सिनेमात असलेल्या वेगळ्याच संवादांमुळे सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर सध्या बरेच चर्चेत आहेत
 Adipurush's dialogue to Stealing the song Manoj Muntsheer has been involved in controversy before
Adipurush's dialogue to Stealing the song Manoj Muntsheer has been involved in controversy before SAKAL
Updated on

Manoj Muntashir News: आदिपुरुष सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. आदिपुरुष सिनेमावर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

सिनेमात वादात अडकण्याची अनेक कारणं आहेत. यातलं एक मुख्य कारण सिनेमातले संवाद. सिनेमातले संवाद सध्या प्रेक्षकांना खटकले आहेत.

रामायणासारख्या विषयावर आधारित असलेल्या पौराणिक सिनेमात असलेल्या वेगळ्याच संवादांमुळे सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर सध्या बरेच चर्चेत आहेत. कोण आहेत मनोज मुंतशीर जाणून घेऊ.

( Adipurush's dialogue to Stealing the song Manoj Muntsheer has been involved in controversy before)

 Adipurush's dialogue to Stealing the song Manoj Muntsheer has been involved in controversy before
Adipurush Nepal: काठमांडू मध्ये आदिपुरुष वर बंदी, यापुढे कोणताही बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणार नाही

कोण आहे मनोज मुंतशीर:

४७ वर्षीय मनोज मुंतशीर यांचे खरे नाव मनोज शुक्ला आहे. ते उत्तर प्रदेशात राहतात. एचएएल स्कूल कोरवा येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. मनोज हा व्यवसायाने संवाद लेखक, कवी, पटकथा लेखक आहे.

त्यांनी 'तेरी मिट्टी (केसरी), 'गलियां (एक खलनायक) सारखी अनेक लोकप्रिय बॉलीवूड गाणीही लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी आज लोकांच्या प्लेलिस्ट मध्ये असतात.

नावाजलेली कामगिरी:

मनोज मुंतशीर यांनी बॉलिवूड गाण्यांमधील लेखनासोबतच 'इंडियाज गॉट टॅलेंट', "इंडियन आयडॉल ज्युनियर' सारख्या लोकप्रिय शोसाठी देखील लेखन केले आहे. त्याच्या उल्लेखनीय कामात 'बाहुबली' चित्रपटाचाही समावेश आहे.

बाहुबलीच्या डायलॉग लेखनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. याशिवाय मनोजने 'मेरी फितरत है मस्ताना' हे पुस्तकही लिहिले आहे. त्यांच्या या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

 Adipurush's dialogue to Stealing the song Manoj Muntsheer has been involved in controversy before
Karan Deol Reception: बॅण्ड बाजा बारात.. करण अन् द्रिशाचं ग्रॅंड रिसेप्शन

गाण्याच्या चोरीबद्दल वाद

2021 मध्ये, मुंतशीर यांच्यावर गाणं चोरल्याचा आरोप लागला. त्यांनी अक्षय कुमारच्या 'केसरी'साठी लिहिलेले 'तेरी मिट्टी' हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं. हे गाणं त्यांनी स्वतः लिहिलं नाही असा आरोप त्यांच्यावर कारण्यात आला.

या आरोपांवर उत्तर देताना मनोज म्हणाले होते.. “माझी कोणतीही निर्मिती 100% ओरिजिनल नाही. माझ्याविरुद्ध याचिका दाखल करा आणि मी न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करेन.

मोमीनच्या ओळींनी तेरी गलियां या गाण्याचा एक श्लोक प्रेरित केला, तेरे संग यारा फिराख गोरखपुरी यांच्या दोह्यांवरून प्रेरित झाला आणि माझे स्वतःचे तेरी मिट्टी हे गाणे बर्‍याच भाषांमध्ये अनुवादित झाले आहे पण माझे नाव कुठेही लिहिलेले आहे असे मला वाटत नाही.

 Adipurush's dialogue to Stealing the song Manoj Muntsheer has been involved in controversy before
Adipurush मध्ये बिभीषणच्या बायकोच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री, तिचे वडीलही दिग्गज अभिनेते

आदिपुरुषचा वाद

आदिपुरुष सिनेमातील संवाद सध्या व्हायरल होत आहे, “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरी बाप की”. हे मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहे.

ज्यावर लोक त्याला ट्रोल करत आहेत आणि माफी मागायला सांगत आहेत. त्यामुळे लेखक म्हणून जरी प्रतिभावान असले तरीही मनोज मुंतशीर यांच्यामागचे वाद काही सुटले नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.