आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' या गाण्याने देशातच नव्हे तर जगभरात लोकांना आवडत आहे. हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये हा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज केल्यानंतर, चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
सुप्रसिद्ध जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि मनोज मुनताशिर यांनी लिहिलेले, या गाण्याचे बोल भगवान श्री रामच्या सामर्थ्याच दर्शन घडवतात.
केवळ मनमोहक व्हिज्युअल्सद्वारेच नव्हे, तर एक वेगळीच अनुभुती देणार हे गाणे कालच भव्य पद्धतीने लाँच करण्यात आले. या गाण्यातून श्रीरामभक्तीचा जागर करण्यात आला.
जय श्री राम हे गाणे अजय आणि अतुल यांनी त्यांच्या संपूर्ण टीमसह लाइव्ह ऑर्केस्ट्रासह रिलीज केले. अजय आणि अतुल यांनी गाण्याच्या लाँचिंगवेळी सांगितले की, हे गाणे बनवताना त्यांच्यासोबत काही जादूई शक्ती होती.
जय श्री राम गाण्याला रिलिज होवुन केवळ 24 तास झाले असून या गाण्याने नवीन रेकॉर्ड केला आहे. या गाण्याचा व्हिडिओ गेल्या 24 तासात यूट्यूबवर सर्वाधिक पाहण्यात आलेला व्हिडिओ ठरला आहे.
सुरवातीच्या आकडेवारीनुसार, आदिपुरुषच्या या गाण्याला 29,940,973 व्ह्यूज आणि 556 K लाईक्स मिळाले आहेत, जे अक्षय कुमारच्या 'क्या लोग तुम' गाण्याला मागे टाकत गेल्या 2 तासात या गाण्याला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहे.
अजयच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटासाठी त्याने संगीतबद्ध केलेले हे पहिले गाणे होते. जेव्हा त्याला चित्रपटाची ऑफर आली होती. त्याला त्याच्या स्केलबद्दल सांगण्यात आलं. श्रीरामाचे नाव ऐकताच ती शक्ती आणि भक्ती आपोआपच त्यांच्यात आली.
गाणं बनवताना ही जादूई शक्ती त्याच्यासोबत होती. त्यांची गाणी एवढ्या मोठ्या स्तरावर प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्यावर थेट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. गाण्याला मिळत असलेल्या प्रेमामुळे तो अवाक आहे.
आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. आता जय श्री राम या गाण्याने लोकांची उत्कंठा आणखीणच वाढवली आहे.
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खानसह अनेक कलाकार दिसणार आहेत. आदिपुरुष हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे, परंतु तो रिलीज होण्यापूर्वी अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे.
अनेक वाद आणि ट्रोलिंगनंतर आदिपुरुष आता चित्रपट चाहत्यांमध्ये त्याच्या जागी यशस्वी होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.