Aditi Rao Hydari: अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या नावावर आणखी एक पुरस्कार.. 'ज्युबिली' साठी..

उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर म्हणून तिला गौरवण्यात आले.
Aditi Rao Hydari wins Trailblazer Performer of the Year for ‘Jubilee’
Aditi Rao Hydari wins Trailblazer Performer of the Year for ‘Jubilee’sakal
Updated on

मोजक्याच पण खास चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सुंदर आणि तितकीच अप्रतिम अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी. पद्मावत, रॉकस्टार, वजीर आणि इतर अनेक चित्रपटांमधील भूमिकांमधुन तिने तिची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

अत्यंत कमी वयात तिनं बरच यश संपादन केलं. काही महिन्यांपूर्वी आलेली तिची 'जुबिली' वेब सिरिज विशेष गाजली. याच वेब सिरिज साठी तिला खास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सध्या सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा आहे.

(Aditi Rao Hydari wins Trailblazer Performer of the Year for ‘Jubilee’)

Aditi Rao Hydari wins Trailblazer Performer of the Year for ‘Jubilee’
Ram Charan: मुलगी झाली हो! लग्नानंतर ११ वर्षांनी अभिनेता रामचरण आणि उपासना झाले आई- बाबा..

पीरियड ड्रामाची राणी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या अभिनेत्री अदिती राव हैदरीने "ज्युबिली" मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरी साठी प्रतिष्ठित ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. मनोरंजन इंडस्ट्रीत प्रतिभावान अभिनेत्री म्हणून अदिती ला ओळखलं जातं.

"ज्युबिली" हा एक अफलातून सिनेमॅटिक अनुभव असून त्याचा कथेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अदिती राव हैदरी हिने "सुमित्रा कुमारी " हे पात्र अनोख्या तऱ्हेने साकारून या भूमिकेला चार चाँद लावले आहेत.

Aditi Rao Hydari wins Trailblazer Performer of the Year for ‘Jubilee’
Samir Choughule: कोकणी मातीतला.. हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी समीर चौघुलेची खास पोस्ट..

 बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अदिती राव हैदरी ही सर्वोत्कृष्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती लाखो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करतात. ही अभिनेत्री लवकरच संजय लीला भन्साळीच्या 'हीरा मंडी' या वेब सिरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सिरिजमधील तिचा फर्स्ट लुक पाहून चाहते घायाळ झाले होते. आता तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.