गायक आणि 'इंडियन आयडॉल १२'चा Indian Idol 12 सूत्रसंचालक आदित्य नारायण Aditya Narayan नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. इंडियन आयडॉलचं बारावं पर्व नुकतंच संपलं. पवनदीप राजन या पर्वाचा विजेता ठरला. विविध कारणांमुळे हे पर्व चांगलंच चर्चेत होतं. कधी परीक्षकांनी शोवर टीका केली तर कधी स्पर्धकांच्या गायनामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आता पर्व संपल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदित्यने ट्रोलिंगविषयी सडेतोड भूमिका मांडली आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला, "हे वर्ष खूपच कठीण आहे. या कठीण परिस्थितीतही शो चांगला व्हावा म्हणून संपूर्ण टीमने मेहनत घेतली. उत्तम संगीत आणि उत्तम कंटेट यावर आमचा विश्वास नसता तर हे सर्व शक्य झालं नसतं. लोकांनी जर स्पर्धकांना निराश करण्याचा प्रयत्न केला तर मी शांत बसणार नाही. अर्थात, मला माझ्या सीनिअर्सविषयी खूप आदर आहे पण याचा अर्थ असा नाही की माझं मत मांडणार नाही. मला जर एखादी गोष्ट मांडायची असेल तर मी नक्कीच माझा आवाज उठवणार."
ट्रोलिंगविषयी तो पुढे म्हणाला, "मी वयाने तरुण दिसत असेन पण एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये मला २७ वर्षांचा तर टेलिव्हिजनवर मला १६ वर्षांचा अनुभव आहे. योग्य काय आणि अयोग्य काय याची मला जाणीव आहे. सध्याच्या किशोरवयीन ट्रोलर्सना कदाचित माझं काम माहित नसेल कारण जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा त्यांचा जन्मसुद्धा झाला नसेल."
आदित्यने २००७ साली 'सा रे ग म प' या रिअॅलिटी शोचं पहिल्यांदा सूत्रसंचालन केलं. त्यानंतर त्याने इंडियन आयडॉलच्या अकराव्या आणि बाराव्या पर्वाचं सूत्रसंचालन केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.