Aditya Pancholi : आदित्य पांचोलीची मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'हे' आहे कारण

अभिनेता आदित्य पांचोलीची मुंबई उच्च न्यायालयात धाव
Aditya Pancholi
Aditya Pancholi esakal
Updated on

Aditya Pancholi Case : बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अशा परिस्थितीत आता आदित्य पांचोलीने बलात्काराचा खटला रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आदित्य पांचोली (Aditya Pancholi) यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, जून २०१९ मध्ये उपनगरीय वर्सोवा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता, परंतु आजपर्यंत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही किंवा पोलिसांनी क्लोजर रिपोर्टही सादर केलेला नाही.

Aditya Pancholi
Allu Arjun चा अमेरिकेत डंका, 'इंडिया डे परेड'मध्ये ग्रँड एंट्री

काय आहे संपूर्ण प्रकरण

अभिनेता आदित्य पांचोली याने २०१९ मध्ये एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. आदित्य पांचोली यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, जून २०१९ मध्ये उपनगरीय वर्सोवा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता, परंतु आजपर्यंत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही किंवा पोलिसांनी क्लोजर रिपोर्टही सादर केलेला नाही.

Aditya Pancholi
साजिथ शिवानंदन यांची डिस्नी प्लस हाॅटस्टारच्या प्रमुखपदी नियुक्ती

तपासातही प्रगती नाही?

आदित्य पांचोलीचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी मंगळवारी न्यायमूर्ती एन.एम. जामदार आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या पीठा समोर बाजू मांडली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल न केल्याने तपासात कोणतीही प्रगती झाली नसल्याचे दिसून येते. आदित्य पांचोली यांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. (Bollywood News)

तसेच न्यायालयाने पोलिसांना तपासात झालेल्या प्रगतीची माहिती देण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची संक्षिप्त सुनावणी घेतल्यानंतर पोलीस आणि महिला तक्रारदाराला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

Aditya Pancholi
अल्लु अर्जुनच्या पुष्पा २च्या चित्रीकरणाला सुरुवात? रश्मिकाने शेअर केला फोटो

न्यायालयाचे निर्देश काय ?

पुढील सुनावणीदरम्यान तपासाची स्थिती काय आहे, याची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले. चंद्रचूड म्हणाले की हे प्रकरण २०१९ पासून प्रलंबित आहे आणि त्यांचे ग्राहक बलात्काराचा आरोप असल्याच्या कलंकाबरोबर जगत आहेत. विशेष म्हणजे, या महिलेने तक्रारीत आरोप केला आहे की, जेव्हा ती बॉलिवूडमध्ये नवीन होती, तेव्हा पांचोलीने तिला नशा करून तिच्यावर बलात्कार केला होता. आदित्य पांचोलीने केवळ शारीरीकच नव्हे तर बहिणीचा छळ केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.