Aditya Singh Rajput Death: अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंग राजपूत याच्या मृत्यूची धक्कादायक बातमी समोर आली. त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. त्यांच्या निधनाने अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त आहेत. आदित्य 22 मे रोजी घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला होता.
अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण समोर येईल. त्यातच आदित्यच्या मृत्यू प्रकरणी पोलीस सातत्याने तपास करत आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूवर अनेक प्रकारचे प्रश्नही उपस्थित झाले असून आदित्यच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या प्राथमिक जबाबानुसार, सोमवारी आदित्य सिंग राजपूतचा अंधेरी अपार्टमेंटमधील बाथरूममध्ये घसरून मृत्यू झाला.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आदित्यच्या कानावर आणि डोक्यावर दोन जखमा आहेत. तो खाली पडल्यामुळे या दोन्ही जखमा असू शकतात असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
आदित्य सिंह राजपूत त्याच्या दोन मित्रांसह या अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्यापैकी एक जण गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घरी गेला होता. आणि त्याचा दुसरा मित्र सकाळी कामावर गेल्याने रात्री उशिरा परत यायचा.
आदित्य सिंह राजपूत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्याला खोकला, सर्दी आणि उलट्या होत असल्याचे मोलकरणीने पोलिसांना सांगितले आहे. असे असूनही आदित्यने रविवारीही पार्टी केली होती, पण त्या पार्टीत त्याने काही सेवन केले होते का याची माहीती मिळवण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा पोलिस करत आहेत. गरज पडल्यास व्हिसेराचा नमुनाही घेतला जाईल अशी माहिती आतापर्यंत पोलिसांनी दिली आहे.
ओशिवरा पोलिसांनी त्याचा मोलकरणी, खासगी डॉक्टर आणि वॉचमन या तीन लोकांचे जबाब नोंदवले. त्याची आई दिल्लीहून मुंबईला निघाली आहे. ओशिवरा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
आदित्यला सकाळपासूनच सतत उलट्या होत होत्या त्यामुळे त्याने स्वयंपाकाला खिचडी बनवण्यास सांगितले. दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान आदित्य सिंग राजपूत बाथरूममध्ये गेला, घरातील नोकराने जोरात पडण्याचा आवाज ऐकून त्याला पाहण्यासाठी धाव घेतली, आदित्य जमिनीवर पडला आणि त्याला दुखापत झाली.असल्याचं मोलकरणीने जवाबात सांगितले आहे.
त्यानंतर वॉचमॅन आणि जवळच्या रुग्णालयातील डॉक्टरच्या मदतीने त्याला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून कुटुंबीयांच्या संमतीनंतर आज अंत्यसंस्कार केले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.