Aditya Singh Rajput Death update: स्प्लिट्सव्हिला अभिनेता आदित्य सिंग राजपूतचं २१ मे रोजी निधन झालं होतं. मुंबईत अंधेरी मधील त्याच्या घरातील बाथरुममध्ये पडून त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितलं आहे की त्यांना डॉक्टरांकडून जी माहिती मिळाली त्याच्या नुसार आदित्यचा मृत्यू हा बाथरुममध्ये पाय घसरुन पडण्यामुळे झाला आहे.
पोलिसांनी सांगितलं की त्याला दोन ठिकाणी दुखापत झाली आहे,कानाच्या वरच्या भागाला जखम झालेली दिसत आहे आणि डोक्याला देखील मार बसला आहे,जे कदाचित पाय घसरुन पडल्यामुळे देखील झाले आहे.
अद्याप याचा फॉरेंसिक रिपोर्ट येणं बाकी आहे. ज्यानंतर सगळं काय ते समोर येईल. आता समोर आलं आहे की अभिनेत्याच्या मृत्यूच्या काही तास आधीच त्याचं आईशी बोलणं झालं होतं. त्या दोघांचं शेवटचं बोलणं काय होतं ते जाणून घेऊया.
आदित्य सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आई उषा सिंग राजपूत यांना मोठा धक्का बसला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दावा केला जात आहे की अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण हे ड्रग्सचं अतिरिक्त सेवन आहे,पण याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अभिनेत्यानं मृत्यूआधी आपल्या आईशी शेवटचं बोलणं केलं होतं. त्याची आई उषा सिंग म्हणाल्या की त्यांच्या मुलाला कोणताच मानिसक आजार नव्हता. तो पूर्णपणे ठीक होता.
उषा सिंग पुढे म्हणाल्या की, आदित्यला त्यांनी सोमवारी २१ मे रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कॉल केला होता आणि म्हटलं होतं की,त्यांच्या व्हॉट्सअॅपचे सगळे जुने मेसेज डिलिट झाले आहेत.त्यामुळे आदित्यला त्यांनी एक व्हॉट्सअॅपवर मेसेज करायला सांगितला. त्यानंतर २ वाजून २५ मिनिटांनी अभिनेत्यानं आईला -'मम्मा' असं लिहित सोबत एक रेड हार्ट इमोजी देत मेसेज पाठवला होता. या व्यतिरिक्त त्यानं आईला एक व्हॉईस मेसेज पाठवला होता ज्यात त्यानं व्हॉट्सअप वापरताना येणाऱ्या अडचणींविषयी आईला समजवलं होतं.
आदित्यची आई पुढे म्हणाली,''त्याचा आवाज मी तेव्हा शेवटचा ऐकला. त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी कॉल आला तेव्हा त्याच्या मित्रानं या घटनेविषयी सांगितलं होतं. ती बातमी ऐकल्यावर मी एकदम सुन्न झाले होते. माझ्यात हिम्मतच नव्हती की मी इथे येण्यासाठी बॅग भरेन आणि मुंबईला निघून येण्यासाठी विमानाचं तिकिट बूक करेन. माझ्या शेजाऱ्यांनी मला सावरलं आणि मदत केली''.
आदित्य सिंग राजपूतची आई सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्या आहेत. त्या दिल्लीत एकट्याच राहतात. त्यांचे पती दिल्ली हाय कोर्टात वकील होते,ज्यांचा मृत्यू ११ वर्ष आधी २०१२ मध्ये झाला होता. आदित्यची बहिण अमेरिकेत राहते,ती २४ मे रोजी म्हणजे आजच मुंबईत परतली आहे.
आदित्यची आई म्हणाली, ''त्यांना आतापर्यंत अनेक नातेवाईकांचे कॉल आले. आणि प्रत्येकजण बातम्या वाचून आदित्यचा मृत्यू ड्रग्सच्या अतिरिक्त सेवनानं झाला आहे का असा एकच प्रश्न विचारत आहेत. पण यात काहीच तथ्य नाहीय. न्यूज पोर्ट्ल्सनी अशा बातम्या लगेच आपल्या साइटवरनं डिलिट करायला हव्यात. कृपया..माझ्या मुलाला बदनाम करू नका''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.