"आम्ही हतबल आहोत"; अभिनेत्रीला सतावतेय अफगाणिस्तानमधल्या नातेवाईकांची चिंता

या अभिनेत्रीचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला.
arshi khan
arshi khan
Updated on

तालिबानने Taliban कब्जा मिळवलेल्या अफगाणिस्तानमध्ये Afghanistan अनागोंदी कायम आहे. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर तिथल्या नागरिकांची देशातून जीवघेणी पळापळ सुरू झाली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीविषयी जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 'बिग बॉस १४' फेम अभिनेत्री अर्शी खानचा Arshi Khan जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला असून सध्या तिथे राहत असलेल्या तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींविषयी तिने चिंता व्यक्त केली आहे.

'स्पॉटबॉय ई' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अर्शी म्हणाली, "माझा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला आणि त्यानंतर माझं कुटुंब भारतात आलं. तालिबानने तिथली सत्ता काबिज केल्यानंतर मला तिथल्या महिलांविषयी काळजी वाटते. मी अफगाणी पठाण आहे. तिथली सध्याची परिस्थिती पाहून माझ्या अंगावर काटा येतो. तिथलं वास्तव पाहून मला भीती वाटू लागली आहे. मी आता जर तिथे राहत असते तर.. या विचारानेच माझा थरकाप उडतो."

"अफगाणिस्तान आणि काबूलमधील व्हिडीओ पाहून मला जेवणसुद्धा जात नाहीये. माझे कुटुंबीय तिथल्या नागरिकांसाठी प्रार्थना करत आहेत. आमचे काही नातेवाईक आणि मित्रपरिवार तिथे राहतात. सध्याची वेळ अत्यंत वाईट असून आम्ही हतबल आहोत. काहीतरी चमत्कार घडावा या प्रतिक्षेत आम्ही आहोत", असं ती पुढे म्हणाली. अर्शी खान चार वर्षांची असताना तिच्यासह कुटुंबीय भोपाळ येथे स्थलांतरित झाले. अर्शीने २०१४ मध्ये तमिळ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. तिने 'बिग बॉस ११' आणि 'बिग बॉस १४'मध्ये भाग घेतला होता.

arshi khan
'आमची मदत करा..'; अनुराग कश्यपने शेअर केलं अफगाणिस्तानच्या दिग्दर्शिकेचं पत्र

गेली २० वर्षे अमेरिका आणि मित्रदेशांनी अफगाणिस्तानला सावरण्यासाठी आणि तिथली परिस्थिती बदलण्यासाठी मदत केली. अमेरिका, ब्रिटन आणि नाटोचे सैन्य तेथे ठाण मांडून होते. अमेरिकेने तिथून सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर तालिबान्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आणि संपूर्ण सैन्यमाघारीला दोन आठवडे उरले असताना काबूल ताब्यात घेतलं. तालिबानी सैन्याने एका आठवड्यात देशावर ताबा मिळवला. सरकारी फौजांनी त्यांच्यापुढे शरणागती पत्करली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.