Maharashtra Shaheer News: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अंकुश चौधरी या सिनेमात शाहीर साबळेंच्या प्रमुख भूमिकेत झळकत आहे.
थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा अवघ्या काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
याच महाराष्ट्र शाहीर निमित्ताने केदार शिंदेंच्या गाजलेल्या मालिकेची म्हणजेच श्रीयुत गंगाधर टिपरेची (shriyut gangadhar tipre) टीम एकत्र आलीय.
(after 22 years shriyut gangadhar tipre serial team reunion at maharashtra shaheer teaser launch)
महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर लाँच नुकताच झाला. राज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र शाहीरचा टिझर लाँच सोहळा पार पडला. त्यानिमित्ताने श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेची टीम एकत्र आली होती.
मालिकेतील दिलीप प्रभावळकर आबा , शुभांगी गोखले श्यामल, राजन भिसे शेखर असे सर्व कलाकार एकत्र आले होते.
अगदी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोरंजन विश्वातुन गायब असलेली अभिनेत्री रेश्मा नाईक जिने मालिकेत शलाकाची भूमिका साकारली ती सुद्धा दिसली.
पण सर्वांचा लाडका मालिकेतला शिऱ्या म्हणजेच अभिनेता विकास कदम मात्र फोटोत दिसला नाही.
त्यामुळे फॅन्सनी शिऱ्या कुठेय असं म्हणत विकासची आठवण काढली. या सर्व कलाकारांनी दिग्दर्शक केदार शिंदे सोबत खास पोज देत फोटो काढला.
तब्बल २२ वर्षांनी श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील या सर्व कलाकारांना पाहून फॅन्सना खूप आनंद झाला. आता या सर्व कलाकारांमधली रेश्मा वगळता इतर सर्व कलाकार मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत.
दरम्यान केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या टिझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. शाहिरांची धगधगती गाथा अंकुश चौधरीने या सिनेमातून जिवंत केलीय.
या सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदे सुद्धा झळकत आहे. सिनेमात मृण्मयी देशपांडे लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे.
याशिवाय आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे सिनेमात झळकत आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.