Baipan Bhaari Deva : बाईपण भारी देवा सिनेमानंतर आणखी एका मराठी सिनेमाची बॉक्स ऑफीसवर 'अफलातुन' कमाई

अफलातुन सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अफलातुन कमाई केलीय.
after baipan bhaari deva aflatoon marathi movie successfull in box office
after baipan bhaari deva aflatoon marathi movie successfull in box office SAKAL
Updated on

Aflatoon Box Office Report: बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर केलेली कामगिरी पाहून सर्वांना आनंद झालाय.

अशातच बाईपण भारी देवा सिनेमानंतर आणखी एका मराठी सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केलीय. हा सिनेमा म्हणजे अफलातुन. अफलातुन सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अफलातुन कमाई केलीय.

(after baipan bhaari deva aflatoon marathi movie successfull in box office)

after baipan bhaari deva aflatoon marathi movie successfull in box office
Khalapur Landslide: तुमच्या कार्याला सलाम! इर्शाळवाडीतील मुख्यमंत्र्यांची तत्परता बघुन हार्दिक जोशीने केलं कौतुक

अफलातुन सिनेमाची बॉक्स ऑफीस कामगिरी

तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्रांची मजेशीर धमाल असणाऱ्या ‘अफलातून’ चित्रपटाला प्रेक्षकांची अफलातून पसंती मिळाली असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून सगळ्याच वयोगटांतील प्रेक्षकांनी चित्रपटाचे जोरदार स्वागत केले आहे.

शुक्रवारी अफलातून प्रदर्शित झाला असून आज तिसऱ्या दिवशीसुद्धा चित्रपटाला प्रेक्षक पसंतीची पावती देत आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ०.९५ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी २.०३ कोटींची कमाई केली. आठवड्याअखेर ५ कोटींपर्यंत आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अफलातुन सिनेमाची कथा

श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात.

या फसवणुकीच्या प्रकारणाचा छडा लावताना अनेकदा गुंतागुंती उद्‍भवतात वयातून बाहेर पडताना या तिघांची होणारी त्रेधातिरपीट लेखक दिगदर्शक परितोष पेंटर यांनी अत्यंत खुबीने  दाखविली आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस, अशी कलाकारांची  मांदियाळी या चित्रपटात आहेत.

after baipan bhaari deva aflatoon marathi movie successfull in box office
Punyabhushan Mohan Agashe: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशेंचा पुण्यभुषणने सन्मान, मान्यवरांच्या हस्ते गौरव

अफलातून सिनेमाची अफलातुन टीम

अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीपदंडवते यांचे आहेत.  छायांकन  सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे.  मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. 

 संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सी यांचे आहे. चित्रपटाच्यासंगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत.

नृत्य दिग्दर्शन  रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा  मीनल डबराल गज्जर हिची असून  कलादिग्दर्शन नितीन  बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्स ने सांभाळली आहे.

मंगेश जगताप, सेजल पेंटर,  शीला जगताप, अश्विन  पद्मनाभन,  सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहेत. ‘अफलातून’ २१ जुलैला सर्वत्र प्रदर्शित झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.