Akshay Kumar: स्वतःच्या फ्लॉप चित्रपटांचा दोष निर्मात्यांना.. अक्षयची अजब भूमिका

सततच्या फ्लॉप चित्रपटांबाबत अक्षय कुमारने सोडले मौन.. जबाबदारी झटकली..
after flop movies Akshay Kumar says Bollywood should take lessons from Hollywood and Marvel superhero films
after flop movies Akshay Kumar says Bollywood should take lessons from Hollywood and Marvel superhero films sakal
Updated on

Akshay kumar: सध्या बॉलिवूड कुठेतरी मागे पडताना दिसत आहे, आणि ‌बॉयकॉट बॉलिवूड यामुळे देखील प्रेक्षकांच्या मनात बॉलिवूडबदल नकारात्मकता निर्माण झाली आहे. बॉलीवुडच्या तुलनेने साऊथ आणि हॉलीवूड इंडस्ट्रीकडे प्रेक्षकांची चांगलीच ओढ दिसत आहे. शिवाय अक्षय हीरोचे देखील एकामागोमाग एक अनेक चित्रपट फ्लॉप गेले. या सगळ्यावर अक्षय कुमारने मौन सोडले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला..

(after flop movies Akshay Kumar says Bollywood should take lessons from Hollywood and Marvel superhero films)

after flop movies Akshay Kumar says Bollywood should take lessons from Hollywood and Marvel superhero films
Bigg Boss Marathi 4: अपूर्वाने धुव्वा उडवला! अक्षयचा केला घोडा, अमृता कोसळली..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. काही काळापासून अक्षयची जादू बॉक्स ऑफिसवर चालत नसली तरी अक्षय हा इंडस्ट्रीतील नंबर १ कलाकारांपैकी आहे. अलीकडे अक्षय चे 'पृथ्वीराज', कठपुतली, रक्षाबंधन, बच्चन पांडे बॅक टू बॅक अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. यानंतर अक्षयच्या करिअरबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र या अपयशाबाबत अक्षयने चित्रपट निर्मात्यांना जबाबदार धरले आहे.

after flop movies Akshay Kumar says Bollywood should take lessons from Hollywood and Marvel superhero films
Aditya Roy Kapur: आदित्यला व्हायचं होतं क्रिकेटर, पण नशीब फिरलं आणि..

अक्षय कुमारने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'हिंदी चित्रपटांच्या निराशाजनक कामगिरीसाठी प्रेक्षकांना नाही तर चित्रपट निर्मात्यांना दोषी धरले पाहिजे. बॉलीवूडच्या निर्मात्यांनी त्यांच्या काही कल्पना पुन्हा नव्याने तयार करायला शिकणे अत्यावश्यक आहे. लोकांचे मनोरंजन करू शकणारे चित्रपट बनवण्याच्या गरजेवर भर दिला पाहिजे. एवढेच नाही तर मार्वलच्या चित्रपटांकडून काहीतरी शिका, हॉलीवुडकडे बघा, ते कोणत्या प्रकारचे चित्रपट करत आहेत, त्यांच्याकडून शिका..' असेही तो म्हणाला.

पुढे म्हणाला की, ' मार्वलचे चित्रपट तयार करण्याची पद्धत वेगळी आहे, मार्वल असे चित्रपट बनवतात की त्यासाठी सर्वजण एकत्र येतात आणि एकजुटीने काम करतात. त्यांच्या चित्रपटाचे सादरीकरण इतके वेगळे असते की प्रेक्षकांना ते आवडतेच. आम्ही पण असे करायला तयार आहोत पण निर्मात्यांनी अशी स्टोरी आणि सादरीकरण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बॉलिवूडने मार्वल सिनेमांपासून धडा घ्यावा. जेणेकरून प्रेक्षकांना देखील आपल्या खर्च केलेल्या पैसा बाबत निराशा होणार नाही.' असे स्पष्ट मत त्याने मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.