Maharashtra Shaheer: 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट संपला आणि थिएटर मध्ये जे काही झालं ते पाहून..

थिएटर मधील हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होतोय..
after Maharashtra Shaheer movie end in theatre cinema hall audience stands and sing jay jay maharashtra majha song
after Maharashtra Shaheer movie end in theatre cinema hall audience stands and sing jay jay maharashtra majha songsakal
Updated on

Maharashtra Shahir movie latest update: केदार शिंदे दिग्दर्शित आणि बहुचर्चित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे.

या चित्रपटाची गेल्या काही दिवसात बरीच चर्चा झाली. अगदी चित्रपटातील गाणी, किस्से अनेक दिग्गजांचा शाहीरांना लाभलेला सहवाह. 'बहरला हा मधुमास' हे गाणं तर साता समुद्रापार पोहोचलं. शिवाय चित्रपटातील कलाकारांचेही बरेच कौतुक झाले.

दोन दिवसातच या चित्रपटाने सर्वांना भुरळ घातली आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सध्या हा चित्रपट सुरू आहे. अशातच या व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट संपल्यावर घडलेली एक घटना कैद झाली आहे. आणि हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

(after Maharashtra Shaheer movie end in theatre cinema hall audience stands and sing jay jay maharashtra majha song)

after Maharashtra Shaheer movie end in theatre cinema hall audience stands and sing jay jay maharashtra majha song
Ankush Chaudhari Exclusive: शाहिरांशी ना चेहरा जुळत होता ना आवाज.. तरिही का स्विकारली भूमिका? अंकुश स्पष्टच बोलला..

आपल्याला माहीतच आहे की शाहीर साबळे यांच्या 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळाला आहे. त्यांच्या आयुष्यातील हे सर्वाधिक गाजलेलं आणि लोकप्रिय ठरलेलं गीत. या गीताचा चित्रपटात देखील समावेश करण्यात आलेला आहे.

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा शेवटाला 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं सुरू होतं. आणि पडद्यावर शाहीरांना हे गीत गाताना पाहून प्रेक्षकांच्या अंगावरही शहारे येतात आणि सर्व प्रेक्षक उभे राहून या गीताला मानवंदना देतात. अत्यंत अविस्मरणीय आणि अभिमान वाटावा असा क्षण असून त्याचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येक गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं.

शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) पुढे नेत आहेत. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट आता प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा भरभरून प्रेम त्याला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()