स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी, काय लिहिलंय निनावी पत्रात?

स्वरा भास्करनं आपल्या मिळालेल्या धमकी विरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Swara Bhaskar
Swara BhaskarInstagram
Updated on

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान(Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावे एक निनावी पत्र आलं होतं. ज्या माध्यमातून त्या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री स्वरा भास्कर(Swara Bhaskar) हिला एक निनावी पत्र आलं ,जे स्पीड पोस्टच्या माध्यमातून तिच्या घरच्या पत्त्यावर पोहोचलं आणि त्यात तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.(After Salman Khan, Swara Bhasker receives death threat in anonymous letter)

Swara Bhaskar
Udaipur Murder: 'हिंदूंनो जागे व्हा...',पोंक्षेंची पोस्ट Viral

स्वराला आलेलं हे पत्र(Letter) हातानं हिंदी भाषेतून लिहिलं आहे. यामध्ये सावरकरांविषयी आपल्या पोस्टच्या माध्यमातून अपशब्द काढल्यानं मारुन टाकण्याची धमकी दिली गेली आहे. तिला या पत्राला आम्ही दिलेली चेतावणी समज असं देखील म्हटलं आहे. ते पत्र लिहिल्यानंतर शेवटी सहीच्या रुपात लिहिलंय, 'इस देश के नौजवान'. स्वरानं आपल्याला आलेल्या या धमकी देणाऱ्या निनावी पत्राविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रमाणापेक्षा जरा जास्तच सक्रिय पहायला मिळते. ती नेहमीच राजकीय-सामाजिक विषयावर तिखट प्रतिक्रिया देत व्यक्त होताना दिसते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलही व्हावं लागलं आहे. पण मागे हटेल ती स्वरा कुठली. तिचं या-ना त्या कारणावरुन टोकाची विधानं करणं सुरू असतं, ''सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली,सुटकेसाठी याचना केली,त्यामुळे ते 'वीर' पदवीच्या पात्रतेचे ठरत नाहीत...'' अशी पोस्ट तिनं २०१७ मध्ये केली होती. या पोस्टवरनं स्वराला सगळ्यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं.

Swara Bhaskar
शेखर सुमनच्या मुलाला भोंदू बाबानं लुबाडलं; लाखो रुपयांचा लावला गंडा

स्वरानं नुकतीच उदयपुर हत्याकांड प्रकरणावरही पोस्ट केली आहे. तिनं या पोस्टच्या माध्यमातून कन्हैय्यालालच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''ही घटना निंदनीय आहे. मारेकऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. हा मोठा गुन्हा आहे. जसं नेहमी बोललं जातं की,जेव्हा तुम्ही तुमच्या देवाच्या नावावर हत्या करता तेव्हा तुमच्यापासून सुरुवात करा,दुर्बळ राक्षस कुठले''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.