Asha Bhosle Birthday: त्या घटनेनंतर आशा भोसले यांनी ठरवलं.. इथून पुढे सिनेमात अभिनय करायचा नाही

आशाताई भोसले यांना मुंबईमध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आले
asha bhosle, asha bhosle news, asha bhosle maharashtra bhushan
asha bhosle, asha bhosle news, asha bhosle maharashtra bhushanSAKAL
Updated on

Asha Bhosle News: आशा भोसले या मराठी मनोरंजन विश्वातल्या लोकप्रिय गायिका. आशा भोसले यांचं नाव घेतलं कि त्यांचा सदाबहार टवटवीत चेहरा डोळ्यांसमोर येतो. आशा भोसले यांची गाणी, त्यांचा आवाज रसिकांच्या मनात घर करून आहे.

आशा भोसले यांना नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.

या पुरस्कार सोहळ्यात भावना व्यक्त करताना आशा भोसले यांनी सिनेमात अभिनय कधीही करणार नाही हा निश्चय का घेतला याचा खुलासा केलाय.

(After that incident, Asha Bhosle decided not to act in movies maharashtra bhushan)

asha bhosle, asha bhosle news, asha bhosle maharashtra bhushan
Phulrani: सलमानचा जयजयकार, पण मराठी कलाकाराने केलं तर तुमच्या पोटात दुखतं, सुबोध भावेचा तिखट सवाल

सुमित राघवनशी बोलताना आशा भोसले म्हणाल्या.."मला खूप घाम येत होता. असं वाटतं होतं माईक घेऊन मी पळून जावं.. पण गावं लागणार होतं.

कारण नाही गायलं तर घरी येऊन थपडा पडतील.. पुढे या गाण्याचं picturisation पण होणार होतं. पिक्चर मध्ये मी music देणार हे नक्की होतं. पण फिल्म मध्ये मी गाणार हे नक्की नव्हतं.

asha bhosle, asha bhosle news, asha bhosle maharashtra bhushan
Hemangi Kavi: हेमांगीच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट कोणता? जाणून घ्या

आशाताई पुढे म्हणाल्या.. "उन्हामध्ये कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या ठिकाणी आम्हाला चालवलं. शूटिंग ठिकाणी ऊन पडल्यावर काहीतरी उजेड टाकतात ना... उन्हामध्ये reflectors असतात ना त्याने मी बेशुद्ध पडले.

त्यानंतर मी ठरवल सिनेमात कधीही अभिनय करणारा नाही." अशा भावना आशा भोसले यांनी व्यक्त केल्या. अशाप्रकारे आशा भोसले यांनी सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला.

आशाताई भोसले यांना आज मुंबईमध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतरत्न सचिन तेंडूलकर, सुधीर मुनगंटीवार, सुरेश वाडकर, जॅकी श्रॉफ, उदित नारायण उपस्थित होते.

आशा भोसले पुरस्काराला उत्तर देताना म्हणाल्या, मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यासारखे वाटते आहे. महाराष्ट्रात आल्यावर वेगळीच भावना असते.

दहा वर्षांची असताना माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. मी यापुढेही गात राहणार. मला असे वाटते की, महाराष्ट्रभुषण मिळाला तो मला भारतरत्नासारखा आहे. माझ्या घरातून मिळालेला पुरस्कार आहे. मी ९० वर्षांपर्यत थांबले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.