काऊंसिलर ते अभिनेत्री.. 'अग्गंबाई सूनबाई'मधल्या नव्या 'शुभ्रा'चा प्रेरणादायी प्रवास 

uma pendharkar
uma pendharkar
Updated on

झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्या जागी आता 'अग्गंबाई सूनबाई' ही नवी मालिका सुरु होणार आहे. या नवीन मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा तर काहींसाठी नवखा वाटणारा उमा पेंढारकर हा चेहरा दिसणार आहे. व्यवसायाने काऊंलिसर असलेल्या उमाचा अग्गंबाई सूनबाईपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. या मालिकेची संधी कशी मिळाली, त्याबद्दल उमा म्हणाली, "तेजश्री खूप चांगली अभिनेत्री आहे. पण मी या मालिकेत तिच्या जागी आलेली नाही. या शुभ्राचं रुप तिच्यापेक्षा खूप वेगळं आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे. ती एका मुलाची आई आहे आणि मी जे करतेय ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्रं हाती घेतली आहेत. सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घराची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हा दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, ही शुभ्रा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही."

हेही वाचा : रसिका सुनीलच्या प्रपोजलची चर्चा; तिचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण?

 
काऊंसिलर ते अभिनेत्री –
डोंबिवलीकर असलेल्या उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. अद्वैत दादरकरचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती पहिली आली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार मिळाला आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला. तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं. याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचं काम मोठया जबाबदारीनं करते.

हेही वाचा : आर्चीला लागलंय फिटनेसचं याड; फोटो पाहून चाहते 'सैराट'

पहिल्या दिवसापासून जाणवलं आपलेपण–
"तसं पाहिलं तर अग्गंबाई सासूबाईचीच संपूर्ण टीम या मालिकेत आहे. केवळ मी आणि अद्वैत दादरकर वगळता इतर बरेचजण तेच आहेत. त्यामुळे त्यांची एक गट्टी जमली आहे. यात आपण सहभागी होऊ शकू का, असा प्रश्न सुरुवातीला पडला होत. पण पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांनी आपलेपणा दाखवला. नवखेपण कुठे जाणवलंच नाही. निवेदिता ताई असोत, गिरीश ओक असोत किंवा मोहन जोशी सर, हे सर्वजण इतके मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येत आहे," असं तिने सांगितलं. ही नवी मालिका १५ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.