Aishwarya And Avinash narkar
Aishwarya And Avinash narkar esakal

Aishwarya And Avinash narkar: होळी आधी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, "लय भारी"

Aishwarya And Avinash narkar: होळी आधी ऐश्वर्या आणि अविनाश यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Published on

Aishwarya And Avinash narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सोशल मीडियावर विविध रिल्स शेअर करत असतात. मराठी आणि हिंदी गाण्यावरील ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या रिल्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. अशताच आता होळी आधी ऐश्वर्या आणि अविनाश यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी शेअर केला व्हिडीओ

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी "रंग लेके खेलते, गुलाल लेके खेलते, राधा संग होली नंदलाल खेलते" या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश हे जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "होळी स्पेशल.... असे व्हिडीओ शेअर करा आणि आम्हाला टॅग करा..."

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं त्यांच्या व्हिडीओला कमेंट केली, 'लय भारी' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "वयाचा विसर पडेल अशी अदा आहे तुमची"

पाहा व्हिडीओ:

Aishwarya And Avinash narkar
VIDEO: शाहरुख आणि माधुरीच्या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

अविनाश यांनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी फकाट, उदय आणि कॉफी आणि बरंच काही या चित्रटात काम केलं आहे. दुहेरी, महाश्वेता ,या सुखांनो या,सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमध्ये ऐश्वर्यानं काम केलं. अविनाश आणि ऐश्वर्या हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात.

Aishwarya And Avinash narkar
VIDEO: "प्यार तेरा प्यार..."; ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या व्हिडीओची पुन्हा चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.