आराध्याच्या आजीची 'ग्रॅण्ड बर्थडे पार्टी'

ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
aishwarya rai, abhishekh bachchan ,aaradhya and Vrinda Rai
aishwarya rai, abhishekh bachchan ,aaradhya and Vrinda Raiesakal
Updated on

बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रायची (aishwarya rai)आई वृंदा राय (Vrinda Rai) यांचा (23मे) 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ऐश्वर्याने या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये आराध्या(aaradhya) आणि अभिषेक (Abhishek bachchan) देखील दिसत आहेत. वेगवेगळे केक आणून आणि फुलांचे डेकोरेशन करून घरामध्ये ऐश्वर्याच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ऐश्वर्याने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये आराध्या तिच्या आजीला मिठी मारताना दिसत आहे.(aishwarya rai abhishekh bachchan and aaradhya celebrate her mother birthday)

ऐश्वर्याने बर्थ डे पार्टीचे फोटो शेअर करून कॅप्शन दिले,' प्रिय आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तु आमचे जग आहेस.' ऐश्वर्या तिच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. जागतिक मातृत्वदिनानिमित्त ऐश्वर्याने तिच्या लहानपणीचे आणि आराध्याचे काही खास फोटो शेअर केले होते.

एका मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्या आणि त्यांच्या भेटीबद्दल सांगितले,'जेव्हा मी पहिल्यांदा ऐश्वर्याला भेटलो तेव्हा मी प्रोडक्शन बॉय होतो. मी माझ्या वडिलांसोबत स्वित्झर्लंडला मृत्यूदंड या चित्रपटांच्या शूटिंगसाठी गेलो होतो. मी स्वित्झर्लंडमध्ये दोन दिवस एकटा होतो. माझा बालपणीचा मित्र बॉबी देओल तिथे त्याचा पहिला चित्रपट 'और प्यार हो गया'च्या शूटिंगसाठी स्वित्झर्लंडला आला होता.त्यामध्ये ऐश्वर्यादेखील होती. बॉबीने मला एक दिवस जेवणासाठी आमंत्रित केले. तेव्हा मी ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटलो'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()