Drishaym 2: 2015 मध्ये दिग्दर्शित झालेल्या 'दृश्यम 2' सिनेमाला दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामतनं दिग्दर्शित केलं होतं. या सिनेमात अजय देवगण,तब्बू,श्रिया सरन,इशिता दत्ता,मृणाल जाधव,रजत कपूर सारख्या दर्जेदार कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. दृश्यम सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता 'दृश्यम 2' रीलिजच्या वाटेवर आहे. पुन्हा एकदा विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची थ्रिलर आणि सस्पेन्सनं भरलेली कहाणी आपल्या भेटीस येत आहे. (Ajay Devgan on changes in Drishyam 2, hidni version defferent from south version)
'दृश्यम 2' हा साऊथ सिनेमाचा रीमेक आहे आणि गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक सिनेमांच्या रीमेककडे पाठ फिरवताना दिसत आहेत. रीमेक जवळपास फ्लॉपच झाले आहेत. अशात आता अजय आणि 'दृश्यम 2' चा दिग्दर्शक अभिषेक पाठकने खुलासा केला आहे की त्यांचा सिनेमा मोहनलालच्या सिनेमापेक्षा खूप वेगळा आहे. यामध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. नवीन व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आला आहे. आणि असे बरेच बदल केल्याचं दोघांनी म्हटलं आहे.
मल्याळममध्ये देखील सिनेमाचं नाव दृश्यम आहे. रिमेक करताना ते बदललेलं नाही मल्याळम सिनेमात मोहनलाल लीड रोल मध्ये आहे. 'दृश्यम 2' विषयी बोलायचं झालं तर या सिनेमाचे मल्याळम आणि तेलुगु व्हर्जन आधीपासूनच OTT वर रीलिज झालेले आहेत. इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव होता त्या काळात मिलियनहून अधिक लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सिनेमाचे मल्याळम आणि तेलुगु व्हर्जन पाहिलेले आहेत. अशातच आता अजय देवगण आणि दिग्दर्शक अभिषेक पाठकने या सिनेमाचं हिंदी व्हर्जन कसं वेगळं आणि एकदम नवीन आहे असं सांगितल्यानं उत्सुकता वाढली आहे.
गोव्यात 'दृश्यम 2' च्या ट्रेलर लॉंच दरम्यान अजय देवगण बोलला की,'' 'दृश्यम 2' मध्ये अनेक नवीन व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आला आहे,खूप बदल करण्यात आले आहेत. लोकांनी मल्याळम व्हर्जनमध्ये अक्षय आणि गायतोंडे या दोन व्यक्तिरेखा पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे खूप गोष्टी नवीन आहेत सिनेमात. पण असं करताना सिनेमाचा आत्मा मात्र तसाच आहे,त्याच्याशी छेडछाड केलेली नाही. त्यामुळे मला वाटतं की सिनेमा पाहिल्यावर लोकांना काहातरी नवीन पाहतोय असं नक्कीच वाटेल''.
सिनेमा विषयी दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाला की, ''सिनेमाची कथा फुलवण्यातच मी खूप महिने घेतले,खूप गोष्टी यात दिसतील ज्या मल्याळम,तेलुगूत पाहिल्या नसतील लोकांनी. जेव्हा सिनेमा लिहायला घेतला तेव्हा आम्ही लगेच शुटिंग नाही सुरू केलं. सिनेमा लिहिण्यात ७ महिने गेले. खूप बदल केले गेले, आणि म्हणून हिंदी व्हर्जन हा मल्याळम,तेलुगू पेक्षा एकदम वेगळा आहे''.
सिनेमात अजय देवगणने विजय साळगावकर ही व्यक्तिरेखा साकारली आहे,जो आपल्या कुटुंबासोबत खूप खुश असतो. त्याच्या आयुष्यात वादळ येतं,जेव्हा त्याच्या मोठ्या मुलीच्या हातून एक खून होतो. आणि हे लपवण्यासाठी ते संपूर्ण कुटुंब एक कहाणी तयार करतं, ज्यात मोठं गुपित दडलं आहे. 'दृश्यम 2' मध्ये यापुढे काय घडतं ते दाखवलं गेलं आहे. विजय साळगावकर पुन्हा पोलिसांना चकमा देईल की सगळं सत्य समोर येईल..हे पाहणं रंजक असेल.
दृश्यम २ च्या मल्याळम व्हर्जनविषयी बोलायचं झालं तर यात मोहनलाल,मीना, अंसिबा हसन,ईस्थर अनिल यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात रिलीज झाला होता. २०१३ मध्ये बनलेल्या सिनेमाचा हा सीक्वेल होता,ज्याला जीतू जोसेफनं दिग्दर्शित केलं होतं. कोरोनामुळे सिनेमाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केलं गेलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.