विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. या चित्रपटाच्या भावनिक कथेशी खूप प्रेक्षक कनेक्ट होत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. हा चित्रपट लोकांवर किती प्रभाव टाकू शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
द काश्मीर फाईल्सच्या कथेवर Impressed झाला अजय
अनेक बॉलीवूड सेलेब्स ही चित्रपटाच्या समर्थनामध्ये पुढे येत आहेत आणि प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी अपील करत आहेत. आमिर खाननंतर आता अजय देवगनने देखील द कश्मीर फाइल्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काल २१ मार्चला रनवे ३४ चा ट्रेलर लॉन्च दरम्यान, मीडियाने अजय देवगनसोबत द काश्मीर फाईल्सबाबत संवाद साधला. यावेळी ''खऱ्या घटनांचे चित्रपट बनवणे हा प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे का? या या प्रश्नावर उत्तर देताना अजय म्हणाला की, ''नाही असे नाही, हे फक्त हिंदुस्थानमध्ये नव्हे... संपूर्ण जगात आहे. यापूर्वी 'द लिजेंड ऑफ भगतसिंग' सारखे चित्रपट मी केले आहेत. काही कथा इतक्या प्रेरणादायी असतात आणि बर्याचदा सत्य इतके आश्चर्यकारक असते की. आपण तशा काल्पनिक कथा लिहूच शकत नाही.
अजय पुढे म्हणाला की, खरी घटना शोधणे ही कल्पना नसते... जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऐकता तेव्हा तुम्हाला वाटते की ही वेगळी गोष्ट घडली आहे, ती जगासमोर आली पाहिजे. म्हणून आम्ही ती निवडतो, नाहीतर आम्ही स्वतः कथा लिहितो आणि तयार करतो.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.