1 Year Of RRR: अजय देवगण म्हणतोय, Natu Natu गाण्याला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला कारण..

Natu Natu गाण्यात राम चरण आणि Jr. NTR या दोघांनी भन्नाट डान्स केला
RRR, RRR oscars, Rajamouli, Ajay devgan, natu natu
RRR, RRR oscars, Rajamouli, Ajay devgan, natu natuSAKAL
Updated on

Natu Natu Oscar 2023: केवळ भारतामध्ये नाहीतर जगभरामध्ये सध्या RRRचे कौतूक सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे.

या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्याने बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडच्या कलाकारांनी राजामौलींच्या RRR वर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

एखाद्या भारतीय सिनेमाची वर्षभर चर्चा होणं तशी दुर्मिळ गोष्ट. पण ब्लॉकबस्टर RRR रिलीज होऊन आज एक वर्ष पूर्ण झालंय.

(Ajay Devgan Says Natu Natu Song Won Oscar Because Of Me)

RRR, RRR oscars, Rajamouli, Ajay devgan, natu natu
Phulrani Review: प्रियदर्शनी - सुबोधचा 'फुलराणी' गाजणार कि आपटणार? जाणून घ्या एका क्लिकवर

कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच अजय देवगणने हजेरी लावली होती. त्यावेळी अजय देवगणची ओळख देताना कपिल शर्मा म्हणाला.. अजय सर अभिनंदन. तुम्ही काम केलेल्या RRR मधील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला.

पुढे अजय कपिलला म्हणाला, "नाटू नाटू ला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला. समजा मी नाचलो असतो तर.." असं म्हणताच सगळ्यांमध्ये एकच हशा पिकला.

RRR, RRR oscars, Rajamouli, Ajay devgan, natu natu
SS Rajamauli : 'तुम्ही म्हणाल तशी पार्टी देईल, फक्त...' राजामौलींच्याबाबत RRR चा रामचरण बोलून गेला!

Natu Natu गाण्यात राम चरण आणि Jr. NTR या दोघांनी भन्नाट डान्स केला. याच सिनेमात अजय देवगणची सुद्धा महत्वपूर्ण भूमिका होती.

जर अजय देवगणने डान्स केला असता तर Natu Natu गाणं कसं झालं असतं? याची कल्पनाच करवत नाही. आज RRR ला एक वर्ष पूर्ण झालं. RRR ला ऑस्कर मिळाल्याने जगभरात भारतीयांची मान या अभिमानाने उंचावली गेलीय.

ऑस्कर पुरस्कार मिळणे आणि या मोठ्या सोहळ्याचा भाग बनणे ही मोठी गोष्ट आहे. 12 मार्च रोजी, RRR चित्रपटातील नाटु-नाटु या गाण्याने ऑस्कर जिंकून संपूर्ण देशाला आनंद दिला आहे.

हा क्षण संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा होता. प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते. परदेशात नाटु-नाटुची खूप चर्चा झाली. सगळ्यांच्या ओठांवर फक्त RRR चं नाव होतं.

RRR, RRR oscars, Rajamouli, Ajay devgan, natu natu
Bheed Review: लॉकडाऊनमधल्या भयंकर दुःखाची हृदयस्पर्शी कहाणी, कसा आहे भीड? जाणून घ्या

Oscar सोहळ्यात एक खास गोष्ट घडली ती म्हणजे केवळ नाटु-नाटु चे संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्र बोस यांना ऑस्करमध्ये मोफत पास देण्यात आले होते.

पण सर्वांनी पाहिले की, एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि इतर काही कुटुंबातील सदस्यही या मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या सर्वांसाठी वेगळे तिकिटे काढण्यात आली. त्यामुळे खिशातले पैसे खर्च करत एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण ऑस्कर मध्ये सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()