Maidaan Movie Teaser Out Now: अजय देवगणचा आगामी मैदान सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात भारतीय फ़ुटबॉलचा सुवर्णकाळ पाहायला मिळतोय. अजय देवगणचा दमदार अभिनय या टिझरमध्ये बघायला मिळतोय.
काहीच दिवसांपूर्वी अजय देवगणच्या मैदान सिनेमाचं पोस्टर रिलीज झालंय. एक माणूस, एक विश्वास, एक स्फूर्ती अशी टॅगलाईन असणारा अजय देवगणचा मैदान सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.
(ajay devgan upcoming maidaan movie teaser out now)
सिनेमाच्या टिझरमध्ये भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ दिसतोय. सिनेमाच्या टिझरमध्ये १९५२ ची ऑलीम्पिक स्पर्धा दिसते. या स्पर्धेत पाऊस पडतो आणि भारतीय फुटबॉल टीम ऑलीम्पिक स्पर्धेत अनवाणी पायांनी मैदानात उतरते. अजय देवगण भारतीय टीमचा कोच असतो. सिनेमात १९५२ ते १९६२ हा भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ दिसतो. या काळात संघाला आलेल्या अडचणी, लोकांकडून झालेला विरुद्ध असा अनेक गोष्टी या साधारण १ मिनिटाच्या टिझरमध्ये दिसतात.
काय असेल मैदानची कहाणी ?
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक राहिलेल्या सय्यद अब्दुल रहीम यांना फुटबॉल विश्वात खूप आदर आहे. भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना जाते.
कॅन्सरशी झुंज देऊनही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणारे रहिम हे फायटर मानले जातात.
सय्यद अब्दुल रहीम हे 1950 ते 1963 पर्यंत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. अजय देवगण सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसत आहेत.
बधाई हो चे दिग्दर्शक अमित शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. बोनी कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय.
दरम्यान 'दृश्यम २' नंतर अजय देवगण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दणक्यात एन्ट्री करतोय ते त्याच्या आगामी 'भोला' सिनेमातून. अजय देवगणच्या 'भोला' सिनेमाची सर्वांनां उत्सुकता आहे.
'भोला' अशा व्यक्तीची कहाणी आहे जो १० वर्ष जेलमध्ये सजा भोगल्यानंतर आपल्या मुलीला भेटतो आणि मग त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहतो.
या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव व्यतिरिक्त तब्बू देखील मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.