अजय देवगण (Ajay Devgan) ने खरंतर अॅक्शन हिरो म्हणून बॉलीवूडमध्ये आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. 'फुल और काटें' या त्याच्या पहिल्या सिनेमात त्यानं दोन चालत्या मोटरबाईकवर उभं राहून केलेला स्टंट आजही आठवला की अजयचं कौतूक वाटतं. त्या सिनेमानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. खरंतर हॅन्डसम हिरो कॅटेगरीत न बसणाऱ्या अजयनं अभिनय,अ्ॅक्शन आणि उत्तम विनोदी टायमिंगची जाण या गुणांवर बॉलीवूडच्या सुपरस्टार्समध्ये आपलं नाव कैक वर्षापूर्वी सामिल केलं अन् आजतागायत त्याच्या त्या स्थानाला कुणीही हलवू शकलेलं नाही. खान मंडळींना पुरुन उरणाऱ्यांमध्ये जसा अक्षय आहे तसचा अजयदेखील आहे बरं का. आता तो पहिल्यांदाच त्याच्या 'Runway 34' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता असा तीन भूमिकांमधून एकत्र पहिल्यांदा आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच निमित्तानं गोलमाल सिरीज दिग्दर्शक रोहित शेट्टीनं अजय संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाला आहे रोहित शेट्टी?
रोहित शेट्टी(Rohit Shetty) यांनी एकत्र सुपरहीट सिनेमे दिले आहेत,त्यामुळे अर्थातच त्यांच्यात चांगलं बॉन्डिंग आहे हे माहित आहे आपल्याला. पण तुम्हाला माहित आहे का अजय आणि रोहित शेट्टीचे वडिल हे दोघेही सिनेइंडस्ट्रीत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम पहायचे. त्यामुळे अर्थातच रोहित आणि अजय हे दोघेही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत असतील. त्यामुळे दोघांना एकमेकांचे थोडेबहुत सीक्रेट्स तर माहित असणारंच नाही का.
'Runway 34' च्या ट्रेलर लॉंचला रोहित शेट्टीला खास निमंत्रण होतं. तेव्हा त्यानं सांगितलं,''दोन वर्षापूर्वी मी अजयच्या 'तान्हाजी' सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला उपस्थित होतो. त्या सिनेमानं अनेक रेकॉर्ड्स केले. आणि आता मी पुन्हा 'Runway 34' ट्रेलर लॉंचला आलो आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे म्हणून मी आज अजयचं देखील एक सत्य इथे सांगतो जे कदाचित कोणाला माहित नसावं . अजय देवगण या सिनेमाचं दिग्दर्शन करीत आहेत,पण मला माहितीय अजयला अभिनेता बनायचं नव्हतं. त्याला पहिल्यापासनं दिग्दर्शक बनायचं होतं. त्या सिनेमाच्या तंत्राचं उत्तम जाण आहे. त्याच्या इतके सिनेतंत्रज्ञानात पारंगत असलेले इंडस्ट्रीत खूप कमी जणं आहेत. प्रेक्षकांनी त्याच्या सिनेमाला नेहमीच दाद दिलीय. मला वाटतं त्याच्या दिग्दर्शनाला यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल. त्यानं 'Runway 34'साठी एका वेळेला तब्बल १३-१४ कॅमेरे हॅंडल केलेयत, ते देखील कॉकपीट मध्ये. कॉकपीट म्हणेज जिथं विमानात वैमानिक बसतात ती जागा. आता त्या एवढ्याशा जागेत अवजड साधनांना हॅंडल करत शूट करणं कठीण असतं जे अजयनं यशस्वीरित्या पार पाडलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.