"अजय देवगणला पैसे पाठवणार"; नाशिकमध्ये एकजण चक्क रस्त्यावर मागतोय भीक!; Video होतोय व्हायरल

ajay devgn bheek maango andolan for actor ajay devgn against online gaming ad nashik man viral video
ajay devgn bheek maango andolan for actor ajay devgn against online gaming ad nashik man viral video
Updated on

बॉलिवूडचा 'सिंघम' म्हणजेच अजय देवगणचे नाव इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांच्या यादीत नक्कीच अव्वल येईल. त्याच्यासोबत चित्रपट करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांची रांग लागलेली दिलूस येते. तो लवकरच 'मैदान' या चित्रपटात देखील दिसणार आहे. बॉलिवुड चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेते कोट्यवधी रुपयांची मानधन घेतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की अभिनेता अजय देवगण यासाठी एक व्यक्ती रस्त्यावर भीक मागत फिरत आहे, ज्यामुळे त्याचे चाहते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

चित्रपटांव्यतिरिक्त, अजय देवगण अनेक जाहिरातींमध्ये देखील दिसतो, अजय देवगण एका ऑनलाइन गेमिंग अॅपच्या जाहिरातीतही दिसतो,.ज्यामुळे नाशिकचा हा व्यक्ती खूपच अस्वस्थ झाला आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो नाशिकच्या गजबजलेल्या भागात आपली स्कूटर पार्क करतो आणि हातात 'अजय देवगण के लिए भीक मांगो आंदोलन!' असं पोस्टर धरून चक्क भीक मागतो.

म्हणून 'भीक मांगो आंदोलन'

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती लाऊड स्पीकरवर यामागील कारण देखील सांगतो. त्याने सांगितले की, मी ऑनलाइन गेमिंग आणि त्याच्या जाहिरातींचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत आहे. या सेलिब्रिटींकडे देवाच्या कृपेने खूप काही आहे आणि तरीही, ते ऑनलाइन गेमिंगला प्रोत्साहन देतात. ज्याचा तरुणांवर वाईट प्रभाव पडतो.

तो व्यक्ती पुढे सांगतो की म्हणून मी ठरवले आहे की, मी हे 'भीक मांगो आंदोलन' करणार आणि पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर भीक मागणार, जे मी अजय देवगणला पाठवणार आहे. त्याने अशा जाहिराती करणे थांबवावे. जर तुम्हाला आणखी पैसे हवे असतील तर मी पुन्हा भीक मागून तुम्हाला पैसे पाठवीन, पण कृपया अशा जाहिरातींना मान्यता देऊ नका. मी गांधी स्टाईल ही विनंती करत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि काही वेळातच याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले.

अजय देवगणचा आगामी चित्रपट

अजय देवगण पुढे 'मैदान' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियमणी सह-कलाकार असणार आहे. या चित्रपटात गजराज राव, रुद्रनील घोष आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटात, अजय पहिल्यांदा फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि त्यात भारतीय फुटबॉलचा 1952 ते 1962 पर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.