Ajit Pawar: पूनम पांडेच्या स्टंटबाबत अजित पवारांना माहितीच नाही; शोक व्यक्त करत म्हणाले, "कमी वयात ती आपल्याला सोडून गेली..."

Ajit Pawar: पूनमच्या स्टंटनंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पूनमच्या या स्टंटबाबत माहिती नव्हतं.
Ajit Pawar,Poonam Pandey
Ajit Pawar,Poonam Pandey
Updated on

Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही चर्चेत आहे. पूनमचं निधन झालं आहे, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली होती. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे पूनमचा मृत्यू झाला आहे, असं त्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पूनमला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्या पोस्टनंतर पूनमनं एक व्हिडीओ शेअर करुन ती जिवंत असल्याचं सांगितलं. कॅन्सरबाबत जनजागृती पसरवण्यासाठी पूनमच्या अकाऊंटवरुन ती पोस्ट शेअर करण्यात आ ली होती, असं सांगण्यात आलं. आता पूनमच्या या स्टंटनंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पूनमच्या या स्टंटबाबत माहिती नव्हतं. त्यांनी सोलापुरातील (Solapur) एका कार्यक्रमात पूनमच्या निधनाच्या बातमीचा उल्लेख करुन शोक व्यक्त केला.

काय म्हणाले अजित पवार?

सोलापुरात महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी महिलांना आरोग्यासंबंधित जागृक राहण्याचा सल्ला दिला. अशातच अजित पवार यांनी या भाषणात पूनम पांडेच्या नावाचा उल्लेख देखील केला. ते म्हणाले, “आज सकाळी मी वर्तमानपत्रात वाचलं की, एक कमी वयाची पांडे म्हणून एक अभिनेत्री होती तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयात ती आपल्याला सोडून गेली. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की, तुम्ही सगळे काळजी घ्या. आम्ही देखील सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ.”

पूनम पांडेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिनं सांगितलं, "मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. पण या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना त्यांचा जीव गमवावा लागतो. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील बरा होणारा आहे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवूयात".पूनम पांडेला सध्या निधनाची खोटी बातमी पसरवल्याबद्दल अनेकजण ट्रोल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.