Ajmer 92 Teaser Out गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रिलिज होणाऱ्या चित्रपटांमुळे मनोरंजन कमी अन् वाद जास्त होत आहे. चित्रपटाचं पोस्टर , टिझर किंवा ट्रेलर येताच नव्या वादाला तोंड फुटतं. त्यात पठाण असो, आदिपुरुष असो किंवा द केरळ स्टोरी. नुकताच 72 हुरें या चित्रपटामुळे देखील असाच वाद रंगला होता.
या वादादरम्यानच आता आणखी एका चित्रपटाचा टिझर रिलिज झाला आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'अजमेर 92' या चित्रपटाचं पोस्टर रिलिज नंतरच वादाला सुरुवात झाली होती. आता या चित्रपटाचे टिझर आज निर्मात्यांनी रिलिज केलं आहे.
पुष्पेंद्र सिंग दिग्दर्शित हा चित्रपट 1987 ते 1992 या काळात राजस्थानमधील अजमेर येथील सुमारे 250 बलात्कार पीडितांच्या सत्य घटनांभोवती फिरतो.
'अजमेर 92' च्या टीझरमध्ये निर्मात्यांनी 1987 ते 1992 या काळात अजमेरमध्ये मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेची कहाणी दाखवली आहे.
आधी मुलींचे न्यूड फोटोशूट केले जाते आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते, असे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की, या बलात्कार पीडित या बहुतेक शालेय आणि महाविद्यालयीन मुली होत्या.
त्यांना शहरातील प्रभावशाली, ताकदवर लोकांनी ब्लॅकमेल केले. त्यां मुलींपैकी अनेकांनी आत्महत्या केल्या. अजमेर 92 चा टीझर देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अलीकडेच, राजस्थान उच्च न्यायालयाने चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. या चित्रपटाची रिलीज डेट सुरवातीला 14 जुलै होती, मात्र नंतर ती बदलून 21 जुलै करण्यात आली आहे
चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर मनाचा थरकाप उडतो. या चित्रपटात मनोज जोशी, करण वर्मा, जरीना वहाब, राजेश शर्मा आणि शालिनी कपूर यांसारखे कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते उमेश कुमार तिवारी आहेत. चित्रपटाचे लेखन सूरज पाल राजक, पुष्पेंद्र सिंग आणि ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. या टिझरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.