akanksha dubey Suicide case update: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे ही 26 मार्च रोजी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत सापडली होती. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं आत्महत्या करत आपलं जिवन संपवलं. अभिनेत्रीने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही.
आकांक्षाच्या आईने गायक समर सिंह आणि संजय सिंह यांच्यावर अभिनेत्रीच्या हत्येचा आरोप केला आहे. मात्र आता या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही आकांक्षाचा मृत्यू फाशीने झाल्याची पुष्टी झाली. दरम्यान आकांक्षाच्या कपड्यांची तपासणी देखील करण्यात आली असून या अहवालात अनेक खुलासे झाले आहेत.
त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. कपड्यांची तपासणी करतांना आकांक्षाच्या अंडरगारमेंटमध्ये स्पर्म्स सापडले आहेत. हा धक्कादायक अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी समर सिंह आणि संजय सिंह यांच्यासह आणखी चार जणांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे डीएनए चाचणीची परवानगी मागितली आहे.
पोलीस आता या प्रकरणातील आरोपी समर सिंग, संजय सिंग, संदीप सिंग आणि अरुण पांडे यांचे डीएनए नमुने घेणार असून पुढील तपास सुरु करणार आहेत.
अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर सिंग आणि संजय सिंग सध्या तुरुंगात आहेत. संदीप सिंगसोबत आकांक्षा शेवटची दिसली होती. आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्री एका पार्टीतून परतली होती.
त्यावेळी संदीप तिला पार्टीतून हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आला होता. हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांनी आकांक्षासोबत फोटो दिसले होते.
तर ती ज्या पार्टीत गेली होती ती अरुण पांडे याच्या घरी होती. त्यामुळे आत्महत्येच्या काही तासापुर्वी ती केवळ या चार लोकांच्या संपर्कात होती.
म्हणुन आता यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. आता या चाचणीतुन आणखी काही धक्कादायक माहिती उघड होउ शकते.
हॉटेलमध्ये आल्यानंतर तिने त्या रात्री रडत फेसबुक लाईव्ह केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.