Akanksha Dubey Suicide: भोजपूरी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेनं आता या जगाचा निरोप घेतला आहे. पण तिच्या निधनानंतर दिवसेंदिवस नव-नवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होतायत. नुकतेच अभिनेत्रीच्या वकीलानं एक हैराण करणारी अपडेट दिली आहे. त्याचा दावा आहे की आकांक्षानं आत्महत्येच्या एक दिवस आधी पार्टी केली होती.
आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या केसमधील गुंता आता सुटण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर तिचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आता वकीलांनी आणखी एक खुलासा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की आत्महत्येआधी आकांक्षानं आपल्या मित्रांसोबत ब्रेकअप पार्टी साजरी केली होती.
एवढंच नाही,वकीलानं हे देखील सांगितलं की ब्रेकअप पार्टीचं सुमारे ११ हजाराचं बिल देखील झालं होतं. हे सगळे पैसे आकांक्षानंच भरले होते. याची पुष्टि पबच्या बाहेरील सीसीटीव्ही फूटेजवरनं केली गेली आहे.
व्हिडीओत आकांक्षा पबमधून बाहेर येताना दिसत आहे. तर पोस्टमार्टम रिपोर्ट अनुसार,अभिनेत्रीनं मृत्यूपूर्वी काही खाल्लं नव्हतं.(Akanksha Dubey Suicide Case update actress did party before death)
आता ब्रेकअप पार्टीची बातमी समोर आल्यानंतर आकांक्षाच्या पोस्टमार्टम रिपोर्टचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिपोर्टनुसार,अभिनेत्रीनं कोणत्याही प्रकारचं मद्यसेवन केलं नव्हतं ना काही खाल्लं होतं. पण तिच्या पोटात जेवणाऐवजी एक पदार्थ सापडला आहे ज्याला तिच्या मृत्यूचं कारण सांगितलं जात आहे. पण अद्याप यावर ठोस काही बोललं गेलेलं नाही.
हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
माहितीसाठी इथं सांगतो की आकांक्षा दुबेनं २६ मार्च रोजी वाराणसी मधील सारनाथ येथील एका हॉटेलात आत्महत्या केली होती. ज्यानंतर तिचा बॉयफ्रेंड समर सिंगवर गंभीर आरोप केले गेले होते. पोलिस समर सिंग आणि त्याच्या भावाचा तपास करत आहेत. आकांक्षाच्या मृत्यूनंतर समर सिंग गायब झाला आहे. तिच्या आत्महत्येनंतर समर सिंगनं एक पोस्ट केली होती ज्यात त्यानं लिहिलं होतं,'निशब्द..'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.