Adipurush Akhilesh Yadav: सेन्सॉर बोर्ड धृतराष्ट्र झालंय का? समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आदिपुरुषवर संतापले

सेन्सॉर बोर्ड धृतराष्ट्र झाला आहे का? असा संतप्त सवाल अखिलेश यादव यांनी विचारलाय.
 Akhilesh Yadav Samajwadi Party leader was furious with Adipurush and criticised by censor board
Akhilesh Yadav Samajwadi Party leader was furious with Adipurush and criticised by censor boardSAKAL
Updated on

Adipurush Akhilesh Yadav News: आदिपुरुष आणि वाद हे जणू एक समीकरणच बनले आहे. हिंदू राष्ट्रसभा, रामायण मालिकेतले कलाकार, राजकारणी असे अनेक जणं आदिपुरुषवर अक्षरशः तुटून पडले आहेत.

चहूबाजूंनी सिनेमावर सडकून टीका केली आहे. अशातच समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी आदिपुरुषचा खरपूस समाचार घेतलाय. सेन्सॉर बोर्ड धृतराष्ट्र झालाय का ? असा सवाल अखिलेश यादव यांनी केलाय.

(Akhilesh Yadav Samajwadi Party leader was furious with Adipurush and criticised by censor board)

 Akhilesh Yadav Samajwadi Party leader was furious with Adipurush and criticised by censor board
Adipurush मध्ये बिभीषणच्या बायकोच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री, तिचे वडीलही दिग्गज अभिनेते

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आदिपुरुषवर जोरदार टीका केलीय..

अजेंडा घेऊन, राजकीय पुढाऱ्यांच्या पैशाने मनमानी पद्धतीने चित्रपट बनवून लोकांच्या विश्वासाशी खेळणाऱ्यांना सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यांचे 'राजकीय-चरित्र' प्रमाणपत्र तपासले पाहिजे. सेन्सॉर बोर्ड धृतराष्ट्र झाला आहे का? असा संतप्त सवाल अखिलेश यादव यांनी विचारलाय.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही रामाच्या पवित्र कथेचा कसा विनोद केला गेला, अशी टीका केली. आम्ही क्षमस्व आहोत.

राजीव गांधींच्याच्या काळातील 'रामायण' आणि आता नरेंद्र मोदींच्या काळातील 'आदिपुरुष' पहा. आरएसएसचे लोक प्रभू रामांना देवाचा अवतार मानत नाहीत. ते त्याला 'आदिपुरुष' मानतात. असं दिग्विजय सिंग म्हणाले

 Akhilesh Yadav Samajwadi Party leader was furious with Adipurush and criticised by censor board
Pujappura Ravi Death: दिग्गज मल्याळम अभिनेते पुजापूरा रवी यांचं निधन, ८०० पेक्षा जास्त सिनेमात केलंय काम

नेपाळमध्ये बंदी

एकूणच राजकीय वर्तुळातुन आदिपुरुषवर टीका करण्यात आलीय. शुक्रवारी प्रदर्शित झालेला आदिपुरुष काठमांडूसह नेपाळमधील सर्व चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल चालू आहे.

मात्र सोमवारपासून काठमांडूतील चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समध्ये आदिपुरुषसह कोणताही हिंदी चित्रपट न दाखवण्याचा आदेश महापौरांनी जारी केला आहे.

दुसरीकडे, महापौरांच्या सूचनेवरून काठमांडू पोलिसांनी सर्व चित्रपटगृहांना हिंदी चित्रपट न दाखवण्याची सूचना केली आहे. सूचनांचे उल्लंघन केल्यास दंडासह लॉकडाऊन करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.