Akshay Kelkar: रिक्षाचालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता...खरचं अक्षय तु कमाल

अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता झाला आणि ट्रॉफी घरी घेवुन गेला.
Akshay Kelkar
Akshay KelkarEsakal
Updated on

(akshay kelkar is winner of Bigg Boss Marathi 4 winner) गेल्या शंभर दिवसांपासून रंगत असलेला कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोचा अंतिम सोहळा काल मोठ्या दणक्यात पार पडला. गेल्या तीन महिन्यात घरात जोरदार राडे झाले, हाणामारी झाली आणि तितकच मैत्री आणि प्रेमाचे नाते ही तयार झाले.

काल बिग बॉसच्या चौथ्या सिझनला त्याच्या विजेता मिळाला. अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता झाला आणि ट्रॉफी घरी घेवुन गेला. मात्र बिग बॉसच्या त्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरणं हे त्याच्यासाठी सोपं नव्हतं.

Akshay Kelkar
Bigg Boss 4 Marathi : 'अक्षय'नं कोरलं बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव

अक्षय केळकरचा जन्म 16 मार्च रोजी ठाण्यातील कळवा येथे झाला. त्याने कळव्याच्या सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वांद्रे येथे कमर्शिअल आर्ट्समध्ये पदवीचे शिक्षण घेतली आहे. लहानपणापासूनच अक्षयचे कला दिग्दर्शक होण्याचं स्वप्न होतं आणि त्याने मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

Akshay Kelkar
Bigg Boss Marathi 4 Winner : अण्णांची 'शेवंता' हारली! रडली, पण...

अक्षयच्या वडीलाचं नावं जयेंद्र केळकर तर त्यांच्या आईचं नाव कल्पना केळकर आहे. अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. विषेश म्हणजे अक्षय त्याच्या वडिलांच्या रिक्षातूनच बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता. आज तो बिग बॉसचा विजेता आहे.

एकदा अक्षय त्याच्या घरच्या मंडळीबद्दल बोलतांना म्हणाला होता की, त्याचे आई बाबा हे नववी नापास झाले आहेत. त्याचे वडिल रिक्षा चालवुन घर सांभाळत आहे, त्यांनी दोन्ही मुलांना खुप फ्रिडम दिला आहे. त्यामुळेच ते बरोबर मार्गावर चालत आहेत. तो म्हणतो की, शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे. आज त्याच्या आई वडिलांना अक्षयचा नक्कीच अभिमान वाटतं असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.