Akshay Kumar : अक्षय कुमारनं भारतीय नागरिकत्व सोडून 'कॅनेडियन सिटीजनशिप' का घेतली? इतक्या वर्षांनी केला खुलासा

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या बाबत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत.
Akshay Kumar Bollywood Actor Canadian Citizenship
Akshay Kumar Bollywood Actor Canadian Citizenshipesakal

Akshay Kumar Bollywood Actor Canadian Citizenship : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या बाबत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच एका बातमीनं चाहत्यांचे अन् नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्याला कारण असं की, अक्षयनं काही दिवसांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे सांगत त्याविषयी एक पोस्ट शेयर केली होती.

सध्या त्याच्या कॅनेडिनय सिटीझनशिप वरुन वाद रंगल्याचे दिसून येत आहे. त्यावर अक्षयनं पुन्हा एकदा खुलासा केला आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून अक्षयनं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या नावाची ओळख निर्माण केली असली तरी त्याच्या नावाभोवती वेगवेगळे वादही समोर आले आहेत. नागरिकत्व हा देखील त्यापैकी सुरु असणारा वाद हा आहे.

Also Read - माणसं मशीन्सशी संवाद करतील आणि ही आश्चर्याची गोष्ट नसेल..

कॅनडियन नागरिकत्वामुळे अक्षय हा नेहमीच बातमीत राहिला आहे. त्यावरुन त्याला कित्येकदा ट्रोलही करण्यात आले होते. एका मुलाखतीमध्ये आपल्याला कॅनडियन का व्हावे लागले याविषयी सांगितले आहे. सध्या अक्षय हा त्याच्या मिशन रानीगंज या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याचा हा चित्रपटही फारशी कमाई करु शकलेला नाही. त्यापूर्वी त्याचा ओएमजी २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मिशन रानीगंजच्या निमित्तानं त्यानं जोरदार प्रमोशनही सुरु केले आहे.

सोशल मीडियावर अक्षयला नेहमीच त्याच्या ट्रोलर्सनं कॅनेडियन कुमार या नावानं बोलावले जात होते. आता अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाल्याचे दिसून आले आहे. एएनआयनं दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षयनं काही खुलासे केले आहे. त्यात तो म्हणतो, माझे करिअर सारखे फ्लॉप होत होते. म्हणून पर्यायी करिअरचा विचार करत होतो. यासाठी कॅनेडियन नागरिकत्व घेतले होते.

Akshay Kumar Bollywood Actor Canadian Citizenship
Akshay Kumar : दोन वर्षांत एक डझन चित्रपट फ्लॉप झाले, फक्त 2 चित्रपटांनी अक्षयला दिला आधार!

मी कॅनेडियन झालो कारण एकेकाळी माझ्या फिल्म्स या चालत नव्हत्या. मी त्यावेळी १३ ते १४ फ्लॉप फिल्मस् दिल्या होत्या. त्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला होता. त्यावेळी माझा एक मित्र कॅनडामध्ये राहत होता. त्यानं मला एका जॉबची ऑफरही केली होती. आम्ही दोघे मिळून एक व्यवसाय सुरु करणार होतो. त्यामुळे मी तिकडे गेलो. असे अक्षयनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

भारतात परत का आला?

भारतात मला खूपच प्रेम मिळाले. माझ्या फिल्मसनं चांगला बिझनेसही केला होता. मला खूप सारे चित्रपटही मिळाले होते. पूर्वी माझ्याकडे भारतात राहण्याचे हा केवळ ट्रॅव्हल डॉक्युमेंट होते. पण आता मी भारतात सर्वाधिक टॅक्स भरणारा कलाकार आहे. या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com