Akshay Kumar Revealed dark side of social media : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. याशिवाय वेगवेगळ्या कारणांसाठी खिलाडी हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा ओएमजी २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या बरोबरच त्याच्या मिशन रानीगंजला देखील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आता अक्षय कुमार एका वेगळ्या प्रतिक्रियेसाठी चर्चेत आला आहे. त्यानं जे पालक त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवत नाही त्यांना त्यानं सल्ला दिला आहे.तुम्ही तुमच्या मुलांकडे गंभीरपणे लक्ष ठेवण्याची गरज आहे. असे अक्षयनं म्हटले आहे. लहान मुलांमध्ये सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो असे अक्षयचे म्हणणे आहे.
Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?
केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या अक्षयच्या गेल्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. याशिवाय अक्षय ज्या प्रॉडक्टच्या जाहिराती करतो त्यावरुनही तो ट्रोल झाला आहे. अक्षय सारख्या अभिनेत्यानं पानमसाल्याची जाहिरात करणे कितपत योग्य आहे अशा प्रतिक्रिया त्याला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या नागरिकत्वावरुनही वाद होता. अखेर त्याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.
ज्यांनी बॉलीवूडच्या खिलाडीला ट्रोल केले आहे त्यांना अक्षयनं जशास तसे उत्तर दिले आहे. अक्षयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. तो म्हणतो, सोशल मीडिया हा आता एक व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पालकांनी त्यापासून अधिक सजग आणि सतर्क होणे गरजेचे आहे.
मला माहिती आहे सोशल मीडिया आता पैसे कमविण्याचा मोठा मार्ग झाला आहे. मात्र तुम्ही केवळ लाईक्स आणि कमेंट मिळविण्यासाठी काही जण अतिरेक करतात हे दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर व्हायला हवा. असेही अक्षयनं त्याच्या त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
अक्षयच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास नुकताच त्याचा मिशन रानीगंज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यापूर्वी त्याचा ओएमजी २ देखील प्रेक्षकांची पसंती मिळवून गेला. येत्या काळात तो वेलकम टू द जंगल, हेरा फेरी ३, स्काई फोर्स आणि बडे मिया छोटे मिया नावाच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.