Akshay Kumar Deepfake Video : बॉलीवूडचा खिलाडी 'अक्षय कुमार' ही अडकला 'डीपफेक'च्या जाळ्यात! व्हायरल व्हिडिओनं चाहत्यांना धक्का

बॉलीवूडचे वेगवेगळे सेलिब्रेटी हे डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकताना दिसत आहे.
Akshay Kumar Deepfake Video
Akshay Kumar Deepfake Video esakal
Updated on

Akshay Kumar Deepfake Video Viral: बॉलीवूडचे वेगवेगळे सेलिब्रेटी हे डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकताना दिसत आहे. याची सुरुवात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिकापासून झाली होती. त्या व्हिडिओची दखल चक्क (Deepfake Video And Photo) बिग बी अमिताभ बच्चन यांनी घेतली होती. त्यांनी ज्यानं कुणी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. अशी मागणी केली होती.

रश्मिकानंतर आलिया, नोरा, प्रियंका चोप्रा, काजोल आणि कतरिना यांचे डीपफेक व्हिडिओ समोर आले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील त्याचा सामना करावा लागला होता. त्यानं तातडीनं एक व्हिडिओ पोस्ट करुन आपण कोणत्याही प्रकारे त्या व्हिडिओतील माहितीची जबाबदारी घेत नाही. माझा व्हिडिओ मॉर्फ करुन तो चूकीच्या पद्धतीनं तो सादर करण्यात आला. असे त्यानं म्हटलं होते.

आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या डीपफेक व्हिडिओमुळे (Akshay Kumar Deepfake Video Viral)चर्चेत आला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचं झालं असं की, अक्षय कुमारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तो एका गेम अॅप्लिकेशनच्या बाबत माहिती देतो आहे. त्या गेम अॅप्लिकेशनचे तो प्रमोशन करताना दिसत आहे. त्यानंतर तो फेक व्हिडिओ असल्याचे लक्षात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयनं कधीही अशाप्रकारे कोणत्याही अॅप्लिकेशनची जाहिरात केलेली नाही. त्या व्हिडिओचा मुळ स्त्रोत काय याची चौकशी केली जात आहे. अशाप्रकारे खोट्या जाहिरातीमधून प्रचार करुन अभिनेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यातून तातडीनं मार्ग काढण्यात यावेत. अशी मागणी यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे करण्यात आले आहेत.

Akshay Kumar Deepfake Video
Kangana Reaction Poonam Pandey Death: 'एका तरुण मुलीला कॅन्सर होणं अन्...' पूनम पांडेच्या निधनावर कंगनाची मोठी प्रतिक्रिया!

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यानं कुणी हा फेक व्हिडिओ तयार केला आहे त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अक्षयच्या टीमच्या वतीनं करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.