अक्षय कुमारचा बेल बॉटम तीन देशांमध्ये 'बॅन'

बॉलीवूडचे चित्रपट bollywood movie आणि वाद हे समीकरण जुनेच आहे.
अक्षय कुमारचा बेल बॉटम तीन देशांमध्ये 'बॅन'
Updated on

मुंबई - बॉलीवूडचे चित्रपट bollywood movie आणि वाद हे समीकरण जुनेच आहे. कोरोनाच्या काळात चित्रपट प्रदर्शनावर मर्यादा होत्या. ओटीटीवर ott अनेक चित्रपट आणि मालिका प्रदर्शित झाल्या. त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. अक्षय कुमारच्या बेल बॉटमची akshay kumar bell bottom movie चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली होती. वास्तविक फेब्रुवारीमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊमुळे तो प्रदर्शित झाला नाही. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट म्हणून बेल बॉटमचे नाव घ्यावे लागेल. काल बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र अक्षयच्या इतर चित्रपटांप्रमाणे त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला नाही.

अक्षयच्या बेल बॉटमनं प्रेक्षकांची निराशा केली आहे. त्याला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्या फोल ठरल्या आहेत. मात्र अक्षयच्या दृष्टीनं एक महत्वाची बातमी आहे. त्या बातमीनं कदाचित बेल बॉटमकडे प्रेक्षकांचा कल वाढू शकतो. ती बातमी आहे त्याच्या बेल बॉटम या चित्रपटावर तीन देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यात दाखवण्यात आलेल्या काही प्रसंगामुळे ही बंदी घालण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अक्षयनं या चित्रपटामध्ये स्पायची भूमिका केली आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान या विषयाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. असे असले तरी गल्फ कंट्रीचाही उल्लेख यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे बेल बॉटमवर त्या तीन देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

वासु भगनानी आणि रंजीत एम तिवारी यांच्या बेल बॉटम चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत. आता हा चित्रपट सौदी अरेबिया, कुवेत आणि कतारमध्ये बॅन करण्यात आला आहे. त्याचे कारण असे की, चित्रपटाच्या उत्तरार्धात दहशतवाद्यांनी ज्या विमानाचे अपहरण केले आहे ते लाहोर वरुन दुबईला घेऊन जातात. वास्तविक ही घटना १९८४ मध्ये घडली होती. तेव्हा संयुक्त अरब अमिरातचे संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतुम यांनी हे प्रकरण सांभाळले होते. आणि त्या दहशतवाद्यांना पकडलेही होते.

अक्षय कुमारचा बेल बॉटम तीन देशांमध्ये 'बॅन'
तालिबानी आले, अफगाणिस्तानातील प्रसिद्ध गायिकेनं सोडला देश

बेल बॉटममध्ये या प्रकरणाची मोड़तोड करण्यात आली आहे. ही कामगिरी करताना भारतीय अधिकाऱ्यांना हिरोच्या भूमिकेत दाखविण्यात आले आहे. हिरोच्या भूमिकेत अक्षय कुमार आहे. त्यात़ त्यानं संयुक्त अमिरातचे संरक्षण मंत्री यांना बाजुला केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या कारणास्तव मध्य पूर्व देशांमध्ये बेल बॉटमवर बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.