Akshay Kumar jumped into the Gyanvapi controversy,said...
Akshay Kumar jumped into the Gyanvapi controversy,said...Google

'ज्ञानवापी' वादात अक्षयची उडी, अंधारात तीर मारीत म्हणाला,'ते शिवलिंग...'

'सम्राट पृथ्वीराज' निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विषयांवरील वक्तव्यानं अक्षय कुमार अनेकदा अडचणीत सापडला आहे.
Published on

गेल्या काही दिवसांत अक्षय कुमारचा(Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) या-ना त्या कारणानं वादाच्या भोवऱ्यात फसत चाललाय पण दुसरीकडे त्या सिनेमाच्या निमित्तानं प्रमोशन करताना काही ना काही तरी बोलून अक्षयही वाद ओढवून घेताना दिसत आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात हिंदू राजांच्या बाबतीत जास्त माहिती उपलब्ध नाही याविषयी वक्तव्य करून अक्षयनं स्वतःसाठी अडचण निर्माण केली होती. आता अक्षय कुमारनं ज्ञानवापी वादावर (Gyanvapi Controversy) प्रतिक्रिया देऊन आणखी एक नवी Controversy निर्माण केली आहे. तो म्हणाला आहे की,''ज्ञानवापी मशिदीत जे शिवलिंग मिळालं आहे, ते शिवलिंगा सारखंच दिसतं''. अक्षयच्या या संपू्र्ण वक्तव्याविषयी जाणून घेण्याआधी थोडक्यात माहित करून घेऊया ज्ञानावापी वादासंदर्भात.(Akshay Kumar jumped into the Gyanvapi controversy,said...)

Akshay Kumar jumped into the Gyanvapi controversy,said...
सम्राट पृथ्वीराज: रिलीजच्या एक दिवस आधी आखाती देशांनी केलं बॅन? काय खटकलं?

बनारस मध्ये काशी विश्वनाथाच्या मंदिराशेजारी ज्ञानवापी मशिद आहे,ज्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. या मशिदीत शिवलिंग मिळाल्यानंतर खूप प्रश्न निर्माण झाले आहेत. कोर्टानं या मशिदीच्या परिसरात सर्वे करुन यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी आधी मंदिर होतं का मशिद हे जाणून घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Akshay Kumar jumped into the Gyanvapi controversy,said...
प्रसिद्ध गायक 'KK' पंचतत्त्वात विलीन,भावूक वातावरणात अखेरचा निरोप

व्हिडीओमध्ये जी एक आकृती दिसत आहे ती हुबेहूब शिवलिंगासारखी दिसते असं अक्षय कुमारनं म्हटलं आहे. अक्षयनं एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की,''जे निदर्शनास आलं आहे त्यावर सरकार ,एएसआय,पुरातत्व विभागाचे तज्ञ किंवा इतर अभ्यासक अधिक चांगल्या पद्धतीनं बोलू शकतील. त्यांना यासंदर्भात अधिक योग्य माहिती असेल. मी फक्त ज्ञानवापी मशिदी संदर्भातला व्हिडीओ पाहिला आहे. एवढं त्यातलं काही आपल्याला समजणार नाही पण दिसायला ती आकृती शिवलिंगासारखी दिसत आहे''.

Akshay Kumar jumped into the Gyanvapi controversy,said...
कोलकाता इथं kk ची हत्या? का होतेय CBI चौकशीची मागणी? नंदिता पुरी नाव चर्चेत

कंगना रनौतने देखील काही दिवसांपूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात जे सापडलं आहे ते शिवलिंग आहे असं सांगितलं होतं. कंगना 'धाकड' सिनेमाच्या प्रमोशनसाठी बनारसला गेली होती. त्यावेळी ती ज्ञानवापी मशिदीच्या वादावर बोलली होती. कंगना रनौत म्हणाली होती,''मथुरा के कण-कण में भगवान कृष्ण और अयोध्या कण-कण में भगवान राम बसते है,उसी तरह काशी के कण-कण में भगवान शिव बसते है''. अक्षय देखील 'सम्राट पृथ्वीराज' च्या प्रमोशनसाठी बनारसला जाऊन आला आहे. त्यानं गंगा घाटीत डुंबण्याचा आनंदही अनुभवला आणि तिथल्या जगप्रसिद्ध गंगा आरतीचा लाभही घेतला.

Akshay Kumar jumped into the Gyanvapi controversy,said...
अनन्या पांडेनं केलाय सेक्सिझमचा सामना; म्हणाली,'माझ्या स्तनांवरही लोक...'

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर सोबत संजय दत्त,सोनू सूद देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()