Mission Raniganj: आधीच सिनेमा कमाईत अपयशी अन् त्यात..! अक्षयचा मिशन राणीगंज ऑनलाईन लीक झाल्याने मोठा फटका

मिशन राणीगंज ऑनलाईन लीक झाल्याने अक्षय कुमारला मोठा फटका बसलाय
akshay kumar mission raniganj leaked online in hd in prirated sites parineeti chopra drj96
akshay kumar mission raniganj leaked online in hd in prirated sites parineeti chopra drj96SAKAL
Updated on

Mission Raniganj News: अक्षय कुमारचा मिशन राणीगंज सिनेमा शुक्रवारी ६ ऑक्टोबरला संपूर्ण भारतात रिलीज झाला. सिनेमाला समीक्षकांनी गौरवलंय. अनेकांनी सिनेमाला चांगलं रेटींग दिलंय. पण अक्षय कुमारच्या मिशन राणीगंजला दोनच दिवसात मोठा झटका लागलाय.

मिशन राणीगंज अवघ्या दोन दिवसात ऑनलाईन लीक झालाय. त्यामुळे अक्षय कुमार आणि मिशन राणीगंजच्या निर्मात्यांना मोठा झटका बसलाय.

(akshay kumar mission raniganj leaked online in hd in prirated sites)

akshay kumar mission raniganj leaked online in hd in prirated sites parineeti chopra drj96
Bigg Boss 17: या अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटरची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री; कोण आहे ती?

अवघ्या दोन दिवसात सिनेमाची HD प्रिंट डाऊनलोड

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. मात्र रिलीजनंतर अवघ्या काही तासात सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की 'मिशन रानीगंज' हा चित्रपट MovieRulz, FilmyZilla, TamilRockers यासह अनेक पायरेटेड वेबसाइटवर लीक झाला आहे. या साईट्सच्या माध्यमातून लोकं एचडी प्रिंटमध्ये चित्रपट डाउनलोड करत आहेत.

पायरेटेड साईट्सवर लीक झाल्याने मोठा फटका

केवळ मिशन राणीगंज नाही तर याआधीही अनेक सिनेमांना पायरेटेड कॉपीचा फटका बसलाय. अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटापूर्वी या पायरेटेड साइट्सवर 'चंद्रमुखी 2', 'फुक्रे 3', 'द वॅक्सीन' वॉरसह अनेक चित्रपट लीक झाले आहेत.

पायरेटेड साइट्सवर चित्रपट लीक झाल्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होतो. या पायरेटेड साइट्सनी अनेक चित्रपटांच्या कलेक्शनचं नुकसान केलं आहे. मिशन रानीगंज सुरुवातीपासूनच अपेक्षित कमाई करण्यास अपयशी ठरत आहे. अशातच ऑनलाईन लीक झाल्याने सिनेमाला मोठा फटका बसला आहे.

काय आहे मिशन राणीगंज सिनेमाची कथा?

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘मिशन राणीगंज’ ही खऱ्या आयुष्यातील नायक जसवंत गिलची कथा आहे. अक्षय कुमारने चित्रपटात जसवंत गिलची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत 65 खाण कामगार अडकल्याच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. अक्षय कुमार अभिनीत पात्र जसवंत सिंग गिल सर्व 65 खाण कामगारांचे प्राण वाचवते. या घटनेनंतर जसवंत सिंग गिल हे 'कॅप्सूल गिल' म्हणून ओळखले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.