Akshay Kumar Latest News अक्षय कुमार आता बॉक्स ऑफिसचा बादशहा राहिलेला नाही असे दिसत आहे. एक काळ असा होता जेव्हा खिलाडी कुमारचे चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होणे सामान्य होते. परंतु, आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेले अक्षय कुमारचे (Akshay Kumar) तीन चित्रपट हेच सांगतात. या अभिनेत्याचे लागोपाठ दोन चित्रपट फ्लॉप (Flop) झाले आहेत. आता तिसराही रांगेत आहे.
अक्षय कुमारचा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला रक्षाबंधन चित्रपटाचे पाच दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. पाच दिवसांत ५० कोटींचा टप्पा गाठणे तर दूरच ४० कोटीही कमावले नाही. या चित्रपटाने सोमवारपर्यंत केवळ ३४.४७ कोटींची कमाई केली आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी रक्षाबंधनाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहे.
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) रक्षाबंधन हा चित्रपट नॉन परफॉर्मर (Flop) ठरला आहे. अनेक सुट्ट्या असूनही चित्रपटाने पाच दिवसांपैकी एकाही दिवशी दोन अंकी कमाई केलेली नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी ८.२० कोटी कमावले. शुक्रवारी ६.४० कोटी, शनिवारी ६.५१ कोटी, रविवारी ७.०५ कोटी, सोमवारी ६.३१ कोटींची कमाई केली. धक्कादायक बाब म्हणजे १५ ऑगस्टला चित्रपटाची कमाई वाढण्याऐवजी घसरली.
पाचव्या दिवसाची आकडेवारी पाहता अक्षय कुमारचा चित्रपट कामकाजाच्या दिवसात आणखीनच खराब होणार असल्याचे दिसते. सुट्टीत चित्रपट कमाई करू शकला नाही तर आठवड्याच्या दिवसात काय कमाई करणार? जणू रक्षाबंधनाला प्रेक्षकांनी नकार दिला आहे. अक्षय कुमारचा या वर्षातील हा तिसरा फ्लॉप ठरत आहे.
आमिरने अक्षयला टाकले मागे
अक्षयच्या रक्षाबंधनासोबत प्रदर्शित झालेला लाल सिंग चड्ढा हा चित्रपटही फारसा चालला नाही. मात्र, आमिर खानच्या चित्रपटाचे आकडे यापेक्षा खूपच चांगले आहे. आमिर खानचा चित्रपटही पाच दिवसांत ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकलेला नाही. चित्रपटाने ४६ कोटींची कमाई केली आहे. आमिर खानने अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे.
चित्रपटाकडून फारशी कमाई अपेक्षित नाही
रक्षाबंधनाबद्दल बोलताना समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु, चित्रपटाबद्दल बोललेले सकारात्मक शब्दही काम आले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या नात्याची कथा आणि प्रेम दाखवते. चित्रपटात भूमी पेडणेकर अक्षयची प्रेमिका बनली आहे. येत्या आठवड्यात या चित्रपटाकडून फारशी कमाई अपेक्षित नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.