Akshay Kumar News: अक्षय कुमार सध्या त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचे या वर्षात OMG 2 सोडल्यास इतर सिनेमे फ्लॉप झाले. अशातच अक्षयच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. मिशन रानीगंज सिनेमानंतर अक्षय पुन्हा एकदा बायोपीकमध्ये झळकणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत आर. माधवन सुद्धा झळकणार आहे. कोणता आहे हा बायोपीक? जाणून घ्या.
(akshay kumar new biopic sardar based on C Sankaran Nair)
अक्षय कुमार दिवंगत वकील आणि कार्यकर्ते सी शंकरन नायर यांच्यावरील बायोपिकमध्ये झळकणार आहे. नवोदित दिग्दर्शक करणसिंग त्यागी या बायोपीकचं दिग्दर्शन करणार आहे.
या बायोपीकसाठी कुप्रसिद्ध जालियनवाला बाग हत्याकांडाचे चित्रण करणाऱ्या प्रसंगाचं शूट करण्यात येणार आहे. ज्यासाठी, अंधेरी येथील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मैदानावर जवळजवळ 500 सरदार हा प्रसंग शुट करण्यासाठी एकत्र जमले होते.
'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर' असं या सिनेमाचं नाव असुन रघू आणि पुष्पा पालट यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा असणार आहे.
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या आधी नायर यांनी 1915 मध्ये व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून काम केले होते. परंतु 1919 मध्ये हत्याकांडानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयानंतर भारतीय स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा मिळाल्याचं म्हटलं जातं.
'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर' सिनेमाच्या सेटवरील एका सूत्राने माहिती दिली की, सिनेमाचं शूटिंग गेल्या आठवड्यात सुरू झाले. “सरदारांचा मोठा जमाव या प्रसंगाचे शूटिंग करण्यासाठी एकत्र जमला आहे. हा प्रसंग शूट करण्यासाठी 10 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागेल,”
या बायोपीकमध्ये अक्षय कुमारसोबतच आर. माधवन आणि अनन्या पांडे हे कलाकार सुद्धा झळकणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.