अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ चा वाद, करणी सेनेचा विरोध

अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची घोषणा केली होती.
Akshay Kumar, manushi chhillar
Akshay Kumar, manushi chhillar file photo
Updated on

अभिनेता अक्षय कुमारने 2019 मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा अक्षयने ट्विट करून या चित्रपटाबद्दल माहिती दिली. अक्षयने ट्विट केले होते, 'वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्या एतिहासिक सिनेमाची घोषणा करताना गर्व वाटतोय. हा सिनेमा माझ्या आतापर्यंतच्या मोठ्या सिनेमांपैकी सर्वात मोठा सिनेमा आहे. पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे.' या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा चित्रपट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाच्या नावाला करणी सेनेने विरोध केला आहे.(Akshay Kumar Prithviraj faces backlash from Karni Sena)

करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष सुरजीत सिंह राठोड यांनी ‘पृथ्वीराज’सिनेमाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे. याविषयी ते म्हणाले,'जर चित्रपट महान राज्यकर्ता पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे तर चित्रपटाच्या नावातही त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला पाहिजे आणि त्यांचा आदर करण्यात यावा.' तसेच सुरजीत सिंह राठोड यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांकडे चित्रपट रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी स्क्रीनिंग करण्यात यावं अशी मागणी केली आहे. 'जर त्यांनी आमचा सल्ला मानला नाही तर त्यांना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल. ‘पद्मावत’ सिनेमावेळी संजय लिला भन्साळी यांच्या सोबत काय झालं हे ध्यानात ठेवावं. या सिनेमाच्या निर्मात्यांना देखील मग यासाठी तयार रहावं लागेल.' असा इशारा पृथ्वीराज चित्रपटाच्या निर्मात्यांना सुरजीत यांनी दिला.

Akshay Kumar, manushi chhillar
'तुम्हाला लाज वाटायला पाहिजे'; अनुपम खेर भडकले

‘पृथ्वीराज’ सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.मानुषी या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयुक्ता यांची भूमिका साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून आदित्य चोपडा निर्मिती करणार आहेत.

Akshay Kumar, manushi chhillar
'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'
https://www.esakal.com/video-story/seven-years-of-bjp-goverment

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.