'Bollywood v/s South' वादात अक्षयची उडी; म्हणाला,'देशात फूट पाडणं बंद करा'

'पृथ्वीराज' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं पार पडलेल्या कार्यक्रमात अक्षय कुमारनं अनेक विषयांवर आपलं रोखठोक मत मांडलं.
Akshay Kumar
Akshay KumarGoogle
Updated on

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) सध्या आपल्या 'पृथ्वीराज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्यानं पृथ्वीराज चौहान ही व्यक्तीरेखा साकारली आहे. या सिनेमात अक्षयसोबत मानुषी छिल्लर देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. या सिनेमानिमित्तानं आयोजित एका प्रमोशनल कार्यक्रमात अक्षय कुमारनं खूप विषयांवर संवाद साधला. याचवेळी त्यानं गेल्या काही दिवसांत बॉलीवूड(Bollywood) आणि साऊथ(Tollywood) इंडस्ट्रीत सुरु असलेल्या वादावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Akshay Kumar
Divorce नंतर सीमा खाननं बदलली ओळख; इन्स्टाग्रामवर नव्या नावाची चर्चा

गेल्या काही दिवसांत बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्री मध्ये बरीच शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. साऊथ सिनेमातील अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी भाषेवरनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अजय देवगणने ट्वीट करून त्याला खडे बोल सुनावले होते. बस्स,त्यानंतर मग साऊथ सिनेइंडस्ट्री आणि बॉलीवूडमध्ये रोज दिवसाला एक तरी नवा मुद्दा काढून वाद छेडला जाऊ लागला.

Akshay Kumar
विजय-समंथाचा 'लीपलॉक' अन् 'इंटिमेट' सीन; 'Kushi' प्रदर्शनाआधीच चर्चेत

अक्षय कुमारने देखील अनेक दक्षिणेतल्या सिनेमांच्या रीमेकमध्ये काम केलं आहे. प्रत्येक इंडस्ट्रीला त्यानं पाठिंबा दिला आहे. आणि त्याच्या यशामध्ये त्या-त्या इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. भारतीय सिनेमा पुढारतोय,पॅन इंडिया कमाल दाखवत आहे. सिनेमे बॉक्सऑफिसवर खोऱ्यानं कमावताना दिसत आहेत. पण भाषेला घेऊन सुरू असलेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही. याच वादावर बोलताना अक्षयनं आता आपलं मत मांडलं आहे.

Akshay Kumar
'बेबी डॉल' फेम कनिका कपूरच्या हळदी-मेहेंदी समारंभाच्या फोटोंनी वेधलं लक्ष

अक्षय म्हणाला,''चला,आज मी या भाषेवरुन सुरू असलेल्या वादावर स्पष्ट बोलतोच. देशाला विभागू नका,इथे तुम्ही साऊथ इंडिया,नॉर्थ इंडिया,बॉलीवूड असा उल्लेख करूच नका. लोकं काय बोलतात याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की हा भारतीय सिनेमा आहे. मला सगळ्यांच्या सिनेमांनी चांगला व्यवसाय करावा असं वाटतं. आज जे घडत आहे अगदी तसंच देश स्वतंत्र झाला तेव्हा झालं होतं. इंग्रजांनी आपल्यासोबत हेच केलं होतं. त्यांनीच भारताला साऊथ,नॉर्थ,ईस्ट मध्ये विभागलं. तुम्ही विचार करा देशासाठी आपण काय करू शकतो,देशाला काय देऊ शकतो. ते काय बोलतात मग मी त्याला काय उत्तर देतो हे हवंय कशाला. आपण सगळे एकाच इंडस्ट्रीतून आहोत. मी तर म्हणतो,सगळ्यांचे सिनेमे चालले तर आपल्यालाच फायदा होईल''.

Akshay Kumar
कंगनाच्या ताफ्यात आली महागडी Mercedes Maybach, किंमत ऐकून उंचावतील भुवया

अक्षय पुढे म्हणाला, ''मी जेव्हा काम करायला सिनेमात सुरुवात केली तेव्हा सिनेमाचं बजेट १५ लाख असायचं. आज ते २५० ते ४०० करोडवर गेलं आहे. यामध्ये सगळ्यांचीच मेहनत आहे. आज आपण विभागणीची भाषा बोलतोय,हे खूप खेदजनक आहे. आपण देशाला विभागणं बंद करायला हवं. यामागे खरंच कोणाचा तरी हात आहे,जो आपल्यात फूट पाडू पाहतोय. आपल्याला सतर्क रहायला हवं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.