OMG 2 Akshay Kumar: गेल्या काही दिवसांपासुन मनोरंजन विश्वातील चित्रपटांविषयी प्रेक्षकांची नाराजीच आहे. चित्रपटातुन धर्माचा आणि देवाचा अपमान करण्यात येतो असा आरोपही बॉलिवूडवर करण्यात येतो. तसे बरेच वादही समोर आले आहेत. मग तो पठाणमधल्या दिपिकाच्या भगव्या बिकीनीचा असो किंवा आदिपुरुष मधल्या कलाकारांच्या लुकचा.
त्यातच आता देवी - देवतांशी संबधित आणखी एक चित्रपट रिलिज होण्यासाठी सज्ज आहे. हा सिनेमा म्हणजे बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या आगामी चित्रपट OMG 2 .
सध्या OMG 2 ची बरीच चर्चा आहे. काही दिवसांपुर्वीच कलाकाराचा लुकही रिव्हिल करण्यात आला होता. त्यानंतर काल चित्रपटाचा टिझर रिलिज केला गेला. त्याचबरोबर चित्रपटाच्या ट्रेलरची रिलिज डेट ही सांगण्यात आली आहे.
सुपरस्टार अक्षय कुमारने एका जबरदस्त व्हिडिओसह सोशल मीडियावर शेयर केला ज्यात तो गर्दीतून पुढे येताना दिसत आहे आणि लोक हर हर महादेवचा जयघोष करत आहेत. डोक्यावर जटा, कपाळावर भस्म, गळ्यात नील आणि रुद्राक्षाची माळ घातलेला अक्षय कुमार बाबा भोलेनाथसारखा पोशाख घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यातच बरोबर नेटकऱ्यांनी अक्षयला आधिच तंबी दिली आहे. उगाच प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जातील असं काही करु नका. चित्रपट रिलिज करण्यापुर्वी काळजी घ्या असं ही सांगतिलं आहे.
अक्षयच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी त्याला सल्ले दिले आहेत.
एका यूजरने कमेंट केली आहे की, धर्माच्या विरोधात जाऊ नका, हिच विनंती.
तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, "चित्रपटात सनातन धर्माचा अपमान होता कामा नये." , "अक्षय जी, मला आशा आहे की या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत."
तर एकानं लिहिलयं की, हिंदू संस्कृतीचा अपमान होऊ नये हे लक्षात ठेवा. तर दुसऱ्याने "यावेळी सनातन आणि हिंदू देवतांची थट्टा करू नका." अशी विनंती अक्षयला केली आहे.
अक्षय कुमार आणि यामी गौतम स्टारर OMG 2 चे दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अरुण गोविल आणि गोविंद नामदेव असे दिग्गज कलाकार आहेत. OMG 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.