'व्हॉईस ऑफ लव्ह' केके चं निधन; सुन्न झालेल्या बॉलीवूडनं व्यक्त केला शोक

कोलकातामध्ये कॉन्सर्ट दरम्यान प्रसिद्ध गायक केके ला हृद्यविकराचा झटका आल्यानं त्याचं ३१ मे ,२०२२ रोजी निधन झालं आहे.
 Akshay Kumar to Abhishek Bachchan, Vishal Dadlani, Bollywood mourn KK's death
Akshay Kumar to Abhishek Bachchan, Vishal Dadlani, Bollywood mourn KK's deathGoogle
Updated on

बॉलीवूडचा(Bollywood) प्रसिद्ध गायक(Singer) केके(KK) चं निधन ३१ मे,२०२२ रोजी कोलकाता मध्ये मध्यरात्री लाइव्ह परफॉर्मन्सच्या दरम्यान झालं. 'व्हॉइस ऑफ लव्ह' म्हणून ओळखला जाणारा कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके च्या निधनानं त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा झटका लागला आहे. केके च्या निधनाच्या एक दिवस आधीच पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या आणि आता पुन्हा एका प्रसिद्ध गायकाला गमावल्यानं म्युझिक इंड्रस्ट्री सोबत सगळ्या चाहत्यांसाठी ही धक्का देणारी बातमी आहे. हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे केके चं निधन झालं आहे. त्याच्या निधनाची बातमी ऐकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अभिनेता अक्षय कुमार पर्यंत ते संबंध म्युझिक इंडस्ट्रीनं त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता,पटकथाकार सृजीत मुखर्जीनं आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिलं आहे,''मला खूप मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यातच मी केके ला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा वाटलं की आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. मी गुलजार साहेबांसाठी त्याच्या मनात असलेली श्रद्धा पाहून थक्क झालो होतो. माझ्या या नव्या मित्राला श्रद्धांजली वाहताना मन भरुन येतंय. खरंच, माझ्यासोबत संगीतावर खूप साऱ्या गप्पा,खाणं-पिणं,सिनेमा पहाणं या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी तू थोडं अजून थांबायला हवं होतंस''.

 Akshay Kumar to Abhishek Bachchan, Vishal Dadlani, Bollywood mourn KK's death
'बोल्ड सीन पाहताना मराठी प्रेक्षक...' तेजस्विनी,प्राजक्ता स्पष्टच बोलल्या

गेले काही महिने संगीत क्षेत्रासाठी धक्का देणारे ठरत आहेत. संगीतातील दिग्गजांचं एका पाठोपाठ झालेलं निधन सगळ्यांनाच सुन्न करतंय. आधी गानकोकिळा लता मंगेशकर, मग 'डिस्को किंग' बप्पी दा,त्यानंतर पंजाबचा प्रसिद्ध सिद्धू पाजी आणि आता केके खरंच हे सगळंच मन हेलावून टाकणारं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.