अक्षयच्या 'पृथ्वीराज'ला प्रदर्शनाच्या तारखेनं पुन्हा दिला चकमा

'पृथ्वीराज' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा दोन-दोन दिवसांनी बदलत असल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.
Akshay Kumar In 'Prithviraj'
Akshay Kumar In 'Prithviraj'Google
Updated on

अक्षय कुमार(Akshay Kumar) चा ऐतिहासिक सिनेमा 'पृथ्वीराज'(Prithviraj) ला पुन्हा प्रदर्शनासाठी आता एक वेगळी तारीख मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सिनेमाच्या बाबतीत हे असंच वारंवार घडत आहे. सुरुवातीला कोरोनाचे निर्बंध हे कारण दिले गेले होते. पण आता कोरोनाचे निर्बंधही कमी केलेयत तरी या सिनेमाला मात्र प्रदर्शनासाठी सारख्या वेगवेगळ्या तारखांना सामोरं जावं लागत आहे. आता एक बातमी येतेय की,हा सिनेमा दिलेल्या तारखेच्या एक आठवडा आधीच प्रदर्शित केला जाणार आहे. अक्षय कुमारने स्वतः सोशल मीडियावर सिनेमाच्या या बदललेल्या तारखे विषयी माहिती दिली आहे. अक्षयनं सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर करीत लिहिलं आहे की,''मला खूप आनंद होत आहे, कारण सम्राट पृथ्वीराज चौहान यांची यशोगाथा आता लवकर म्हणजे ३ जूनला आपण मोठ्या पडद्यावर पाहू शकणार आहात''.

हा सिनेमा तमिळ आणि तेलगु भाषांमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे. 'पृथ्वीराज' सिनेमाचं दिग्दर्शन डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. या सिनेमात सोनू सूद आणि संजय दत्त देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून मनुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. मनुषी राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारताना दिसणार आहे. १० फेब्रुवारीलाच अक्षय कुमारनं सिनेमातील कलाकारांचे लूक दाखवणारा पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली होती. त्यानुसार सिनेमा १० जूनला प्रदर्शित होणार होता. पण आता पुन्हा ती तारीख बदलली असली तरी एक गोष्ट चांगली घडलीय ते म्हणजे सिनेमा आता एक आठवडा आधी प्रदर्शित होणार आहे. सोनू सूद या सिनेमात कवि चंदरवरदाई च्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्तकाक कान्ह यांची भूमिका निभावताना दिसणार आहे.

Akshay Kumar In 'Prithviraj'
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा जागतिक स्तरावर सन्मान

सर्वात आधी 'पृथ्वीराज' सिनेमा हा या वर्षात २१ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धोक्याची घंटा वाजल्यामुळे बॉलीवूडच्या अनेक मोठ्या निर्मात्यांनी आपल्या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं होतं.त्याच सिनेमात 'पृथ्वीराज'चा ही समावेश होता. 'पृथ्वीराज' सिनेमाच्या नावावरुनही वाद रंगला होता. एका संघटनेने दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल करुन सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी केली होती.

Akshay Kumar In 'Prithviraj'
शाळेतल्या शिक्षिकेला चावला म्हणून 'टायगर' नाव पडलं; खरं नाव वेगळच...

त्यात त्यांनी म्हटलं होतं की,''सिनेमाचं नाव फक्त 'पृथ्वीराज' ठेवण्यापेक्षा 'पृथ्वीराज चौहान' असं त्याचं नाव बदलावं .त्यांनी त्या याचिकेत पृथ्वीराज हे मोठे सम्राट होते, त्यामुळे फक्त 'पृथ्वीराज' हे नाव योग्य नाही,ते 'सम्राट पृथ्वीराज चौहान' असं बदलणं अपेक्षित आहे असाही मुद्दा मांडला होता. पण हायकोर्टानं या याचिकेला रद्द करत त्यावर विचार करण्यासही नकार दिला होता. 'पृथ्वीराज' सिनेमा आधी अक्षय कुमार हा 'बच्चन पांड्ये' सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. फरहान सामजी दिग्दर्शित या सिनेमात कृती सेनन,जॅकलिन फर्नांडिस आणि अरशद वारसी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.