Ali Ali Ga Bhagabai Marathi Song Prasad Khandekar : मराठी मनोरंजन विश्वातील विनोदवीर, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि लक्ष वेधून घेणारा डान्स असं सारं धमाल कॉम्बिनेशन सध्या एका गाण्यातून समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आली आली गं भागाबाई गाण्यानं नेटकऱ्यांना, चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.
आली आली गं भागाबाई हे गाणं आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे. त्यात चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेले दिसतात. जुन्या अंदाजातील ते गाणं ज्या पद्धतीनं नव्या रुपात अन् थाटात प्रेक्षकांसमोर आले आहे त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
एखाद्या गीताची जादू अथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात असल्याचे आपण बघतो. असंच एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल चित्रपटातून आपल्या भेटीला आलं आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीताला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. हे गीत रोहन प्रधान यांनी गायलं आहे.
मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहनयांचं संगीत लाभलं आहे. २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा'या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेश कुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची आहे. सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.
गिरीश कुलकर्णी,सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने,प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर,रोहित माने,सुशील इनामदार चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.