Ali Fazal Viral Video : चाहता सेल्फी घ्यायला गेला, गुड्डू भैय्या चिडला! नेमकं घडलं काय?

प्रसिद्ध अभिनेता अली फझलच्या (Ali Fazal Viral Video) त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांनी चाहत्याला चांगलेच खडसावले आहे.
Ali Fazal Latest News
Ali Fazal Latest Newsesakal
Updated on

Ali Fazal Viral News : खरं तर बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात त्यात प्रसिद्ध अभिनेता अली फझलचे नाव घ्यावे लागेल. या अभिनेत्यानं भलेही गँगस्टर, डॉन म्हणून काही (Ali Fazal Latest News) मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं असेल पण रियल लाईफमध्ये तो शांतप्रिय व्यक्ती असल्याचे सांगितले जाते.

आता सोशल मीडियावर अली फझलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात चाहत्याला अली सोबत सेल्फी घेणं जरा महागात पडल्याचे दिसून (Ali Fazal Viral News) आले आहे. त्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. मिर्झापूर नावाच्या मालिकेमध्ये अली फझलनं गुड्डू भैय्याची भूमिका साकारली होती. या मालिकेतून अलीच्या वाट्याला मोठी लोकप्रियता आल्याचे दिसून आले आहे.

चाहत्यानं भलेही अलीकडे सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फटका अलीलाही बसला आहे. बऱ्याचदा चाहत्यांचा आपल्या आवडत्या सेलिब्रेटींसोबत फोटो घेण्याचा अट्टाहास किती महागात पडू शकतो याचा प्रत्यय अली फझलच्या त्या व्हिडिओवरुन दिसून आला आहे. नेटकऱ्यांनी त्या चाहत्याला तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत समज देण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकं घडलं काय?

इंस्टट बॉलीवूडनं त्यांच्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे.त्यात अली हा एका कपड्यांच्या दुकानातून बाहेर पडतो आहे. त्याच्या हातात कॉफीचा मग आहे. त्या दुकानाच्या बाहेर जे फोटोग्राफर्स आणि चाहते आहेत त्यांना तो ग्रीट करत त्यांच्याकडे बघून स्माईल करतो आहे.अशातच त्या चाहत्यानं त्याच्यासोबत सेल्फी काढण्याच्या घाईत त्याला धक्का दिला.

अलीला चाहत्यानं दिलेल्या धक्क्यामुळे त्याचा तोल जाऊन ती कॉफी त्याच्या व्हाईट ड्रेसवर पडल्याचे दिसून आले. यामुळे अली चांगलाच संतापल्याचे सांगितले जात आहे.

Ali Fazal Latest News
Kiran Rao: "लोक आम्हाला मॉडर्न फॅमिली म्हणतात"; रीना दत्तासोबतच्या मैत्रीबद्दल बोलली किरण राव

अली फझलच्याबाबत बोलायचे झाल्यास सध्या त्यानं अन् त्याची पत्नी अभिनेत्री रिचा चढ्ढानं गुड न्यूज शेयर केली आहे. त्या बातमीनं चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यानं गुड न्यूजची माहिती देणारा जो व्हिडिओ शेयर केला होता त्याचीही जोरदार चर्चा झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.