Alia Bhatt : खळबळजनक! घरात विश्रांती करत होती आलिया; दोघांनी गुपचूप काढले फोटो; प्रायव्हसी...

Alia Bhatt
Alia Bhatt
Updated on

मुंबई - सोशल मीडियामुळे मीडिया अधिकच पॉवरफुल झाला आहे. त्यामुळे सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य अजिबात खासगी राहिलेलं नाही. परंतु घर ही अशी जागा आहे जिथे एखाद्या व्यक्तीला सर्वात सुरक्षित वाटते. परंतु जर घरात गोपनीयतेचा भंग झाला तर काय त्रास होतो, हे आपण समजू शकतो. असच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत घडले आहे.

Alia Bhatt
Eknath Shinde : मोठी बातमी! शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी नव्हे तर या पदावर झाली एकनाथ शिंदेंची निवड

आलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये आराम करत असताना दोन पापाराझींनी फोटो काढून सोशल मीडियावर टाकले. जेव्हा आलियाला याची माहिती मिळाली तेव्हा तिला हे पाहून धक्का बासला. आता तिने मुंबई पोलिसांना यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आलिया भट्टने इन्स्टा स्टोरीमधील आपला एक फोटो शेअर केला आहे, जो पापाराझीने घेतला आहे. ज्यामध्ये ती तिच्या लिव्हिंग रुमध्ये आराम करताना दिसते. या फोटोसोबत अभिनेत्रीने लिहिले की, नेहमीप्रमाणे मी दुपारी माझ्या घरी लिव्हिंग रुममध्ये विश्रांती घेत होते... तेवढ्यात मला असं वाटलं की कोणीतरी मला बघतंय. मी वर पाहिलं तर शेजारच्या इमारतीच्या छतावर कॅमेरे घेऊन दोन लोक दिसले.

Alia Bhatt
“…म्हणून आम्हाला सावध राहावं लागणार” महादेव जानकरांचं मोठं विधान Mahadev Jankar

एखाद्याचे असे फोटो घेणे कितपत शोभतं? असा सवाल आलियाने केला. गोपनीयतेचं उल्लंघन करण्याची हद्द झाली. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. पण तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली, असंच म्हणावं लागेल, असंही आलियाने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टवर आलियाने मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे. तर अर्जुन कपूर आणि आलियाची बहीण शाहीन भट्ट यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया देत या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. अर्जुन कपूरच्या मते, जर एखाद्या महिलेला तिच्या घरात सुरक्षित वाटत नसेल तर याचा अर्थ असा होतो की सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत. यापूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीयांच्या सोबत हीच गोष्ट घडली होती, जेव्हा त्यांच्या लिव्हिंग रूमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()