Alia Deepfake Video : रश्मिकानंतर आलिया भट्ट ठरली डीपफेकची शिकार! त्या व्हिडिओनं चाहत्यांना धक्का

आलियाचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल!
Alia Bhatt Deepfake Video after rashmika mandanna katrina kaif she become victim of misuse of AI technology
Alia Bhatt Deepfake Video after rashmika mandanna katrina kaif she become victim of misuse of AI technology Esakal
Updated on

Alia Bhatt's deepfake video goes viral: सध्या सोशल मिडिया हाताळणं खुपच धोक्याचं काम झालं आहे. कारण रोजच सोशल मिडियावर अनेक डिपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सर्व समान्य लोकांपासून अनेक कलाकारांपर्यंत बरेच लोक या डिपफेक व्हिडिओचे शिकार झाले आहेत. डिप फेक व्हिडिओची चर्चा तेव्हा जास्त सुरु झाली जेव्हा अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

मात्र हा व्हिडिओ तिचा नव्हता तर दुसऱ्याच मुलीचा होता. त्यानंतर बऱ्याच कलाकरांचे डिपफेक व्हिडिओ समोर आले. कतरिना कैफ आणि काजोल, सारा यांचे व्हिडिओही व्हायरल झाले. त्यातच आता आलिया भट्टचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका मुलीने निळ्या रंगाचा फुलांचा को-ऑर्डर सेट परिधान केला आहे. ती मुलगी कॅमेऱ्याकडे अश्लील हावभाव करत आहे. या मुलीच्या चेहऱ्यावर आलियाचा चेहरा एडिट केला आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच कळेत की हा व्हिडिओ दुसऱ्या मुलीचा आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन आलियाचा अश्लील व्हिडिओ बनवला आहे. इतकंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो. रश्मिकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्राने याची दखल घेतली होती आणि नियमावली जारी केली होती.

यावर रश्मिकाने देखील पोस्ट शेयर करत हे खुपच धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. तर सारा तेंडूलकरने देखील तिच्या डिपफेक फोटोबाबत पोस्ट शेयर केली होती. सध्या सायबर सेलची नजर अशा डिपफेक व्हिडिओ बनविणाऱ्या भुरट्यांवर आहे. आता आलियाच्या या व्हिडिओने पुन्हा नेटकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()