Fact Check: मुलीला कुशीत घेऊन दिसली आलिया भट्ट..फोटोवर खिळल्या नजरा..कुणी शेअर केला फोटो?

सोशल मीडियावर सध्या आलिया भट्ट-रणबीर कपूरचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांच्या हातात राहा कपूरच आहे अशा चर्चेला उधाण आलं आहे.
Alia Bhatt, Ranbir Kapoor, Raha Kapoor Fake Photo
Alia Bhatt, Ranbir Kapoor, Raha Kapoor Fake PhotoGoogle
Updated on

Raha Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना गेल्याच वर्षी कन्या रत्नाचा लाभ झाला. आपल्या लाडक्या लेकीचं 'राहा' असं नाव यांनी ठेवलं अन् बघता बघता राहा कपूरही सेलिब्रिटी बनली. आज तिची एक झलक पहायला आलिया-रणबीरचे चाहते व्याकूळ झालेयत. पण अद्याप पर्यंत या सेलिब्रिटी कपलनं आपल्या मुलीचा चेहरा कोणालाच दाखवलेला नव्हता.

आलिया आणि रणबीरनं पापाराझींना नम्रतापूर्ण विनंती केली होती की मुलीचा फोटो काढू नका आणि चुकून काढलाच तर तो पब्लिश करू नका. मीडियानं देखील स्टार्सच्या प्रायव्हसीचा सम्मान राखत आलिया-रणबीरच्या मुलीचा फोटो कुठेच शेअर केला नाही.

फोटो समोर आला तरी चेहरा इमोजीनं कव्हर केला जातो. पण यादरम्यान आता इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल होताना दिसतोय ज्यात आलिया आणि रणबीर एका फोटोत लहान मुलीसोबत दिसत आहे.

ती चिमुरडी आलियानं आपल्या कुशीत पकडलेली आहे. अर्थात फोटो पाहिल्यावर सगळ्यांना ती राहा कपूर आहे असंच वाटलं.. पण आता या फोटोमागचं सत्य काही वेगळंच आहे. चला जाणून घेऊया या व्हायरल फोटोमागचं सत्य.

Alia Bhatt, Ranbir Kapoor, Raha Kapoor Fake Photo
Bigg Boss 16 चा कधी आहे फिनाले? जाणून घ्या डेट,टाईम,लाइव्ह स्ट्रीमिंग..सगळं काही एका क्लिकवर

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा आलिया-रणबीरचा तो फोटो फेक आहे. या फोटोशी छेडछाड करत कोणा एका नेटकऱ्यानं त्याला एडिट केलंय आणि त्याचं रुपच बदलून टाकलं आहे. या फोटोतील मुलगी राहा कपूर नाही..बरं,यातील आलिया-रणबीरचा फोटो देखील ओरिजनल नाही. हा संपूर्ण फोटो फेक आहे.

काही दिवस आधी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं एक मीटिंग ठेवली होती ज्यात त्यांनी सर्व मीडियाला बोलावून विनंती केली होती की कोणीही त्यांच्या मुलीचा फोटो क्लिक करू नये आणि केलाच तर तो शेअर करू नये. आमच्या प्रायव्हसीचा सम्मान ठेवा असं ते म्हणाले होते.

तसंच,त्यावेळेला रणबीर-आलियानं त्या मीटिंगमध्ये खास मीडियाला आपल्या मुलीचा फोटो दाखवला होता. त्यांनी तेव्हा म्हटलं होतं की योग्य वेळ आली की आम्ही आमच्या मुलीचा फोटो शेअर करू.

Alia Bhatt, Ranbir Kapoor, Raha Kapoor Fake Photo
Amrita Rao: 'सगळं जुळून आलं असतं तर अमृता रावचं नशीबच चमकलं असतं..', हृतिकचा 'क्रिश' कसा हातातून निसटला?

या व्हायरल फोटोला पाहून काही नेटकऱ्यांनी मात्र त्या फोटोची छेडछाड करणाऱ्याची चांगलीच शाळा घेतली आहे. सगळ्यांनी फोटोला फेक म्हटलं आहे. आणि असं एडिटिंग करणं बंद करा असा दमही भरला आहे.

आलिया भट्टनं ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील एचएन रिलायन्स इस्पितळात आपल्या मुलीला जन्म दिला होता. आलिया आणि रणबीरनं १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.