Alia Bhatt: कामाठीपुरातली गंगू अजूनही माझ्यात.. आलिया भट्ट काय म्हणाली बघाच

'गंगूबाई काठियावाडी' या भूमिकेविषयी आलियाची खास मुलाखत..
alia bhatt said I have not yet separated myself from Gangubai kathiyawadi
alia bhatt said I have not yet separated myself from Gangubai kathiyawadi sakal
Updated on

gangubai kathiyawadi: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित (Gangubai Kathiyawadi Movies) आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका (Alia Bhatt) असलेल्या 'गंगुबाई काठीयावाडी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. आलियाने या चित्रपटात स्मगलिंग आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या गंगुबाईची भूमिका साकारल्याने तिला ट्रोलही केले गेले. पण चित्रपट पाहून आणि विशेष करून आलियाचा अभिनय पाहून सर्वांचीच बोलती बंद झाली. या चित्रपटाला आणि पर्यायाने आलियाला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. त्यानिमित्ताने घेतलेली आलियाची ही खास मुलाखत.

आज, 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता पाहा ‘गंगुबाई काठियावाडी’चा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर ‘झी सिनेमा’वर होणार आहे. त्या निमित्ताने आलियाची बातचीत करण्यात आली. तेव्हा अजूनही मी गंगुबाईला माझ्यापासून वेगळं करू शकले नाही, असं आलिया म्हणाली. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट का स्वीकारला? तुझ्यासारख्या एका आघाडीच्या नायिकेसाठी ही अगदी अपारंपरिक भूमिका होती. तू तिच्यासाठी कोणती पूर्वतयारी केलीस?असा प्रश्न आलियाला विचारण्यात आला त्यावर ती म्हणाली, 'गंगुबाई आपल्या भोवतीची परिस्थिती फिरवते आणि स्वत:साठी एक अभूतपूर्व जीवन निर्माण करते. ती वरकरणी निर्लज्ज वाटली, तरी मनाने संवेदनशील आहे, ती कणखरही आहे आणि दुबळीही. ती तशी स्वार्थी असते आणि तरीही ती नि:स्वार्थीपणे वागते. तिचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला धक्के देत राहतं. त्यामुळे या परस्परविरोधी भावभावना व्यक्त करण्याच्या उत्सुकतेपोटी मी हा चित्रपट स्वीकारला.'

alia bhatt said I have not yet separated myself from Gangubai kathiyawadi
Boyz 4: तरुणाई करणार कल्ला! तीन भागांच्या यशानंतर येतोय 'बोईज् 4'..

पुढे ती म्हणते, 'गंगुबाई ज्या विश्वात राहते, तिथे मी आजपर्यंत कधी गेलेली नाही. माझी पूर्वतयारी म्हणजे संजयसरांच्या (संजय लीला भन्साळी) सूचना पाळणं हीच होती. ती गंगू नावाची पोरसवदा तरुणी असल्यापासून आम्ही चित्रपटाला प्रारंभ केला आणि तिचं रुपांतर गंगुबाईत व्हायचं होतं. माझ्या संशोधनाचा भाग म्हणून मी हुसेन झैदी यांचं पुस्तक वाचलं. या विषयावरील काही चित्रपट पाहिले. या महिलांची देहबोली आणि भाषा आत्मसात करण्यासाठी काही डॉक्युमेंटरी पाहिल्या. ही व्यक्तिरेखा, तिचं बोलणं, आवाजाची पातळी, इतर आवाज याखेरीज इतरही अनेक गोष्टी या व्यक्तिरेखेला इकडे-तिकडे खेचीत होत्या. त्यात हा विशिष्ट गुजराती काठियावाडी शब्दोच्चार होता. या भूमिकेसाठी मला ती भाषा येणं आणि तिचा अचूक उच्चार करणं आवश्यक होतं. मी प्रथमच या चित्रपटात इतकी खालच्या पातळीवरची भाषा वापरली आहे. व्यक्तिरेखेशी समरस होण्यासाठी काही काळ जावा लागतो. पण मला हे स्पष्टपणे आठवतंय जेव्हा माझ्या अभिनयावर संजयसर खूप खुश झाले होते. तेव्हा मला जाणवलं की मी आता या व्यक्तिरेखेत प्रवेश केला आहे. माझ्या आयुष्यातील तो सर्वात समाधानकारक सर्जनशील अनुभव होता.'

गंगुबाईसारखी लढाऊ स्त्री साकारल्यानंतर तुझ्या जीवनात काय फरक पडला? तू यातून काय मिळवलंस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, 'मी अजूनही स्वत:ला मनाने गंगुबाईपासून वेगळं करू शकले नाही. गंगुबाईची गुंतागुंतीची भूमिका तिच्या सामर्थ्य आणि कमजोरीसह साकारणं हे माझ्यासाठी सर्वात अवघड काम होतं. ती एक भावनाप्रधान, बंडखोर व्यक्ती होती. पण तरीही अनेकदा ती विशिष्ट परिस्थितीत सापडल्यावर आपला त्रागा व्यक्त करीत होती. या गोष्टी मी स्पष्ट करून किंवा कागदावर मांडून सांगू शकत नाही, पण त्या भावनांनी मला एक व्यक्ती म्हणून बदललं आहे. जीवनाने गंगूला दिलेल्या धक्क्यातून सावरून तिला पुढे जगावं लागलं, पण ती केवळ कशीबशी जगली नाही. कोणतीही अडचण समोर आली, तरी तिने हार मानली नाही. ती स्वत:ला दुबळी म्हणवून घेते आणि अनेकदा ती एखाद्या साध्या मुलीसारखी वागते. आपल्याविषयी जगाला काय वाटतं, याची ती अजिबात पर्वा करीत नाही. ती स्वत:शी प्रामाणिक राहते. आपलं म्हणणं जगाला ऐकविते. माझ्या मते या गोष्टी खूपच लक्षणीय आहेत. ती दुसर्‍्यांची मनापासून काळजी घेते ज्यामुळे इतरांना ती आपलीशी वाटते. तेही तिच्यावर प्रेम करतात. मला हे पैलू आवडतात,'अशा भावना आलियाने व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.