काल शनिवारी १४१ व्या जागतिक ऑलिम्पिक सत्राचे उद्धाटन नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये करण्यात आले. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी सुद्धा काल मुंबईत उपस्थित होते.
यावेळी शनिवारी, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
(Alia Bhatt ‘slept off’ inauguration of IOC session by pm modi Deepika Padukone, Shah Rukh Khan sit together)
रणबीर आला कंटाळा तर आलिया झोपली
NMAAC मधून व्हायरल झालेल्या फोटोत पाहायला मिळतंय की, शाहरुख खान दीपिका पादुकोणच्या शेजारी बसला होता, तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या मागे बसले होते. Reddit वर अनेकजण चौघांच्या एकत्रित छायाचित्रावर प्रतिक्रिया देत आहेत, ज्यामध्ये आलिया 'झोपलेली' दिसतेय. रणबीरच्या चेहऱ्यावर कंटाळा आल्याचे हावभाव दिसत आहेत. तर आलिया चक्का डोळे बंद करुन झोपलेली दिसतेय.
रणबीर - आलिया - दीपिका - शाहरुखच्या फोटोवर प्रतिक्रिया
रणबीर - आलिया - दीपिका - शाहरुखच्या या व्हायरल झालेल्या फोटोवर एका Reddit युजरने लिहिलं की, "प्रत्येकजण कंटाळला आहे... आलिया अक्षरशः झोपली आहे... तिला दोषही देऊ नका. मी पण असंच करेन."
आणखी एकाने लिहीलंय की, "आलिया जगाची पर्वा न करता झोपली आहे, रणबीर खऱ्या बॅकबेंचरसारखा फोनमध्ये हरवला आहे, शाहरुख पूर्ण लक्ष देण्याचे नाटक करत आहे, पण त्याचे मन कदाचित दुसरीकडे कुठेतरी भटकत आहे, तर दीपिका गंभीर चेहरा करून ऐकत आहे.."
IOC कार्यक्रमाबद्दल थोडंसं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत 141व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) अधिवेशनाला संबोधित केले. आयओसी सत्र हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या सदस्यांची एक महत्त्वाची बैठक म्हणून काम करते.
जिथे ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. सुमारे 40 वर्षांनंतर भारताने दुसऱ्यांदा IOC सत्राचे आयोजन केले. IOC चे 86 वे अधिवेशन 1983 मध्ये नवी दिल्ली येथे झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.